अवैध मद्यसाठ्यातील संशयितांना पोलीस कोठडी

By Admin | Updated: August 8, 2015 00:23 IST2015-08-08T00:23:47+5:302015-08-08T00:23:47+5:30

नाशिक : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मुंबई भरारी पथकाने गुरुवारी (दि. ६) पहाटे मुंबई-आग्रा महामार्गावर वातानुकूलित कंटेनरवर छापा टाकून ८६ लाख ८५ हजार रु पयांचा मद्यसाठा जप्त केला होता़ या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोघा संशयितांना शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोेठडी सुनावण्यात आली आहे़

Police detained for illegal alcohol abuse | अवैध मद्यसाठ्यातील संशयितांना पोलीस कोठडी

अवैध मद्यसाठ्यातील संशयितांना पोलीस कोठडी

शिक : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मुंबई भरारी पथकाने गुरुवारी (दि. ६) पहाटे मुंबई-आग्रा महामार्गावर वातानुकूलित कंटेनरवर छापा टाकून ८६ लाख ८५ हजार रु पयांचा मद्यसाठा जप्त केला होता़ या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोघा संशयितांना शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोेठडी सुनावण्यात आली आहे़
मध्य प्रदेशकडून मुंबईकडे येणार्‍या महामार्गावर सापळा लावून राज्य उत्पादन शुल्क विभागाने संशयित कंटेनरची (के. ए. २०, जे ६३२७) द्वारका चौकात गुरु वारी पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास कसून तपासणी केली होती़ त्यात १२०० बॉक्स व्हिस्की व सुरु वातीला ४५ क्र ेट (सुमारे ९०० किलो) मासे आढळले होते. या कारवाईत कंटेनरचालक शमीरबाबू अखमद कुटी व शाहीद हमजा या दोघांना अटक करण्यात आली होती. दरम्यान या कंटनेरमधील खराब मासे नष्ट करण्याची परवानगी न्यायालयाकडे मागण्यात आली आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: Police detained for illegal alcohol abuse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.