व्यापारी लुटीतील चौघा संशयितांना पोलीस कोठडी
By Admin | Updated: January 6, 2015 00:46 IST2015-01-05T22:04:12+5:302015-01-06T00:46:23+5:30
नाशिक : भाजीपाला विक्रीचे पैसे घेऊन घराकडे पायी जाणार्या व्यापार्यावर हल्ला करून तसेच डोळ्यात मिरचीची पूड फेकून साडेसहा लाख रुपयांची लूट केल्या प्रकरणी विकी ठाकूर, राहुल नंदन, मुन्ना कानडे व अजय जाधव या चौघा संशयितांना पंचवटी पोलिसांनी रविवारी अटक केली़ या चौघांनाही सोमवारी न्यायालयासमोर हजर केले असता ९ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे़

व्यापारी लुटीतील चौघा संशयितांना पोलीस कोठडी
नाशिक : भाजीपाला विक्रीचे पैसे घेऊन घराकडे पायी जाणार्या व्यापार्यावर हल्ला करून तसेच डोळ्यात मिरचीची पूड फेकून साडेसहा लाख रुपयांची लूट केल्या प्रकरणी विकी ठाकूर, राहुल नंदन, मुन्ना कानडे व अजय जाधव या चौघा संशयितांना पंचवटी पोलिसांनी रविवारी अटक केली़ या चौघांनाही सोमवारी न्यायालयासमोर हजर केले असता ९ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे़
भाजीपाला व्यापारी विनोद सदाशिव अग्रहरी हे मुंबईहून व्यापाराचे पैसे घेऊन २७ डिसेंबर रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास नाशिकला आले़ पेठफाट्यावर उतरून घराकडे पायी जात असताना मोतीसुपर मार्केटजवळ डोळ्यात मिरची पूड टाकून व मारहाण करून त्यांच्याकडील साडेसहा लाखांची चोरट्यांनी लूट केल्याची घटना घडली होती़
या प्रकरणी पंचवटी पोलिसांनी संशयित विकी कीर्ती ठाकूर (२०, गाजवे चाळ, पेठरोड), राहुल वसंत नंदन (२१, रा़ बोडके वाडा, पंचवटी), मुन्ना ऊर्फ मयूर शिवराम कानडे (२१, रा़ मेहेरधाम, पेठरोड) आणि अजय रोहिदास जाधव (२३, शांतीनगर, मखमलाबादरोड) या चौघांना अटक केली़ सोमवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता ९ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे़ (प्रतिनिधी)