पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ संपूर्ण देश एक झाला आहे. भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवर तणाव निर्माण झाला आहे. दरम्यान, आता उत्तर प्रदेश येथील एका तरुणाने सोशल मिडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर 'पाकिस्तान झिंदाबादची' एक पोस्ट शेअर केली. पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतले आहे.
पोलिसांच्या सोशल मीडिया सेलने हे प्रकरण हाती घेतले आहे. उपनिरीक्षकांनी जलेश्वर पोलिस ठाण्यात तरुणाविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. आरोपीला अटक करून तुरुंगात पाठवण्यात आले आहे.
पोलिसांना इंस्टाग्रामवर 'जिद्दी बॉय यूपी शहेनशाह' या नावाने फातिमा फिरदौस २३ वर्षीय महिलेच्या इंस्टाग्राम आयडीवर एक पोस्ट दिसली, यावर त्या तरुणाने पाकिस्तानी ध्वज असलेली पोस्ट टाकली होती आणि त्यात पाकिस्तान झिंदाबाद लिहिले होते.
जिद्दी बॉयचा आयडी शोधला असता, आरोपीचे नाव आणि पत्ता उघड झाला. हा आरोपी जलेश्वर पोलीस स्टेशनमधील हसनगड गावातील मिजुद्दीन अहमदचा मुलगा फैजान असल्याचे निष्पन्न झाले. त्याचे वय १९ वर्षे आहे. त्या तरुणाची चौकशी केली असता, त्याने त्याच्या दुचाकीच्या नंबर प्लेटसह एक फोटोही पोस्ट केल्याचे आढळून आले.
या बाईकचा नंबर ट्रेस करण्यात आला तेव्हा संपूर्ण प्रकरण उघडकीस आले. ही पोस्ट २५ एप्रिल रोजी पोस्ट करण्यात आली होती. मात्र, नंतर प्रकरण पकडले. फैजानचे नाव आणि पत्ता शोधल्यानंतर, जेव्हा पोलिस त्याच्या घरी पोहोचले तेव्हा तो सापडला नाही. पोलिस त्याच्या इतर पोस्टचीही चौकशी करत आहेत.
या संदर्भात जलेश्वर कोतवाली येथे तैनात पोलिस उपनिरीक्षक अभिषेक कुमार यांनी फिर्याद दिली. पोलिसांनी आरोपीला त्याच्या घराजवळून अटक केली आणि त्याचा मोबाईल फोनही जप्त केला.
सीओ ज्ञानेंद्र प्रताप सिंह म्हणाले की, आरोपीने इन्स्टाग्रामवर एका पाकिस्तानी महिलेच्या आयडीवर पाकिस्तानच्या समर्थनार्थ पोस्ट टाकली होती, हे देशविरोधी कृत्य आहे, आरोपीला तुरुंगात पाठवण्यात आले आहे.