शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

जिथे झाला होता विकास दुबेचा एन्काऊंटर, तिथेच पलटली कुख्यात गुन्हेगारांची गाडी, ६ गुंड अटकेत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2021 10:44 IST

Crime News: ज्याठिकाणी विकास दुबेची गाडी उलटली होती. तिथेच हत्या करून पळत असलेल्या सहा कुख्यात गुंडांची गाडीसुद्धा पलटी झाली. या गाडीमध्ये सहा गुंड होते. 

लखनौ - गतवर्षी उत्तर प्रदेशमधील कानपूरमध्ये पोलिसांची हत्या करणारा कुख्यात गुंड विकास दुबे याचा कार उलटल्यानंतर पोलिसांनी केलेला एन्काऊंटर हा वादाचा विषय ठरला होता. कानपूरमध्ये विकास दुबेची गाडी पलटणे आणि त्यानंतर त्याचा एन्काऊंटर होणे यावर विरोधी पक्षाकडून अजूनही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. यादरम्यान, ज्याठिकाणी विकास दुबेची गाडी उलटली होती. तिथेच हत्या करून पळत असलेल्या सहा कुख्यात गुंडांची गाडीसुद्धा पलटी झाली. या गाडीमध्ये सहा गुंड होते.

ही गाडी पलटल्यानंतर या गुंडांचा पाठलाग करत असलेल्या पोलिसांनी गाडीत अडकलेल्या चार गुंडांना घटनास्थळावरून ताब्यात घेतले. तर पळत असलेल्या अन्य दोघांच्या पाठलाग करून मुसक्या आवळल्या. मात्र यावेळी गुंडांनी ना  पोलिसांची बंदूक हिसकावली. ना पोलिसांनी त्यांच्यावर गोळीबार केला. मिळालेल्या माहितीनुसार हे कुख्यात गुंड शनिवारी रात्री उशिरा फजलगंजमध्ये आशिष नावाच्या एका तरुणाची हत्या केल्यानंतर पळून जात होते.

सीसीटीव्हीमध्ये हे गुंड आशिषला बोलावून घेऊन जाताना दिसत आहेत. त्याच आधारावर त्यांना पकडण्यात आले आहे. शनिवारी रात्री फजलगंज येथे राहणारे प्रांशू आणि आशू यांनी आपल्या सहकाऱ्यांसह आशिषची हत्या केली होती. आशिषने आपल्या बहिणीला शिविगाळ केली होती. असा प्रांशूचा आरोप आहे. त्यामुळेच प्रांशूने रागाच्या भरात आशिषला घरी बोलावून मग गोळी मारून त्याची हत्या केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आशिषवर गोळ्या झाडल्यानंतर हे गुंड एका इनोव्हा कारमधून दिल्लीत पळण्याच्या प्रयत्नात होते. मात्र तत्पूर्वीच पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजमधून त्यांची ओळख पटवली. तसेच त्यांचा पाठलाग सुरू केला. बारा टोल प्लाझाच्या आधी त्यांनी पोलिसांना पाहिले आणि गाडीचा वेग वाढवला. त्यानंतर गाडीवरील नियंत्रण सुटून गाडी पलटी झाली आणि हे सर्व आरोपी पोलिसांच्या तावडीत सापडले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसUttar Pradeshउत्तर प्रदेश