शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
3
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
4
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
5
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
6
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
7
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
8
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
9
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
10
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
11
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
12
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
13
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
14
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
15
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
16
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
17
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
18
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
19
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
20
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!

पीओके हा भारताचा भाग, त्यावर आमचा अधिकार - अमित शाह

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2024 18:38 IST

Lok Sabha Election 2024 : पीओके हा भारताचा भाग आहे आणि त्यावर आमचा अधिकार आहे, ते कोणीही नाकारू शकत नाही, असे अमित शाह म्हणाले. 

Amit Shah : नवी दिल्ली : पीओके (PoK) हा भारताचा भाग आहे आणि त्यावर आमचा अधिकार आहे, असे भाजपाचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटले आहे. दरम्यान, सध्या देशात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एएनआयला मुलाखत दिली. यावेळी पीओके हा भारताचा भाग आहे आणि त्यावर आमचा अधिकार आहे, ते कोणीही नाकारू शकत नाही, असे अमित शाह म्हणाले. 

फारुख अब्दुल्ला आणि काँग्रेसचे नेते आज पाकिस्तानकडे अणुबॉम्ब असल्याचे सांगत आहेत. पीओकेची मागणी करत नाहीत. मला त्यांना विचारायचे आहे की, १३० कोटी लोकसंख्येचा देश कोणाच्या तरी भीतीने आपले हक्क सोडणार का? राहुल गांधींनी पाकिस्तानच्या सन्मानाबद्दल बोलून त्यांच्या पक्षाच्या लोकांना काय म्हणायचे आहे ते सांगावे? असा सवाल करत अमित शाह यांनी काँग्रेसवर निशाणा साधला.

याचबरोबर, सर्वोच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन मंजूर केल्याबद्दल अमित शाह म्हणाले, "हा काही नियमित निर्णय नाही, असे मला वाटते. या देशातील अनेक लोकांचा म्हणणे आहे की, स्पेशल ट्रिटमेंट देण्यात आली आहे". तसेच, अमित शाह यांना अरविंद केजरीवाल यांच्या सुटकेबद्दल आणि इंडिया आघाडीच्या प्रचाराविषयी विचारण्यात आले. यावेळी अमित शाह म्हणाले, "सध्या ते (अरविंद केजरीवाल) दुसऱ्या प्रकरणात अडकले आहेत (स्वाती मालीवाल यांच्यावरील हल्ला प्रकरण), त्यांना यातून मुक्त होऊ द्या. बघूया काय होते ते."

कोणीही कोठूनही निवडणूक लढवू शकतो - अमित शाहकाँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या वायनाड (केरळ) आणि रायबरेली (उत्तर प्रदेश) मधून लोकसभा निवडणूक लढवण्याबद्दल अमित शाह म्हणाले, "कोणीही कोठूनही निवडणूक लढवू शकतो, पण राहुल गांधींनी निवडणुकीपूर्वीच सांगायला हवे होते की, ते दोन जागांवर निवडणूक लढवणार आहेत. लोकशाहीच्या दृष्टिकोनातून ते लपवणे योग्य नाही असे मला वाटते. त्यांनी वायनाडच्या लोकांना त्याबद्दल सांगायला हवे होते, जेव्हा तुम्ही मतदानोत्तर सर्वेक्षणात धोका पाहता आणि मग तुम्ही रायबरलीला येता, हे मला योग्य वाटत नाही."

टॅग्स :Amit Shahअमित शाहlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४BJPभाजपाPOK - pak occupied kashmirपीओके