शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

Panjab National Bank Scam: बॅग भरो, निकल पडो; घोटाळेबाज नीरव मोदी अजूनही भारताच्या पासपोर्टवर करतोय जगभ्रमंती!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2018 09:03 IST

चार महिन्यांपूर्वी रद्द झालेल्या पासपोर्टवर नीरव मोदीनं 12 जूनला केला होता प्रवास

नवी दिल्‍ली : पीएनबी बँकेला तब्बल 13 हजार कोटी रुपयांचा चुना लावणाऱ्या नीरव मोदीनं आठवड्याभरापूर्वीच भारतीय पासपोर्टवर प्रवास केला होता. 12 जूनला नीरव मोदीनं युरोस्टार हाय स्पीडनं ब्रिटनची राजधानी लंडन ते बेल्जियमच्या ब्रसेल्स असा प्रवास केला होता. याआधी भारतीय पासपोर्ट रद्द होऊनही नीरवनं चार देशांमध्ये विमान प्रवास केला होता. मात्र 12 जून रोजी ब्रसेल्सला जाण्यासाठी त्यानं विमानाऐवजी रेल्वेला प्राधान्य दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. भारतीय अधिकाऱ्यांनी युरोपच्या इमिग्रेशन अधिकाऱ्यांकडे याबद्दलची माहिती मागितली आहे. युरोपीय अधिकाऱ्यांनी नीरवच्या पासपोर्टची माहिती जमा केली होती. विशेष म्हणजे नीरव मोदीचा पासपोर्ट 24 जानेवारीला रद्द करण्यात आला आहे. याशिवाय 11 जूनला सीबीआयनं इंटरपोलला नीरवविरोधात रेड कॉर्नर नोटीस काढण्याची विनंती केली होती. सीबीआयनं नीरवविरोधात आरोपपत्र दाखल केल्यावर ही विनंती केली होती. याआधी आरोपपत्र दाखल करण्यात आलं नसल्यानं इंटरपोलनं नीरवच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी केली नव्हती. सीबीआयनं इंटरपोलकडे नुकतीच मदत मागितली. याचाच फायदा घेत नीरवनं लंडन ते ब्रसेल्स प्रवास केला. 'तपास यंत्रणांनी याबद्दलची माहिती दिल्यावरच नीरव भारतीय पासपोर्टवर अद्याप कसा प्रवास करतो आहे, याविषयी भाष्य करता येईल,' असं परराष्ट्र मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्यानं सांगितलं. नीरव मोदीचा पासपोर्ट रद्द करण्यात आल्याची आणि त्याच्या प्रवासावर निर्बंध आणले गेल्याची माहिती तपास यंत्रणांकडून इंटरपोलला देण्यात येत आहे, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं.  

टॅग्स :Nirav Modiनीरव मोदीPunjab National Bank Scamपंजाब नॅशनल बँक घोटाळाCBIगुन्हा अन्वेषण विभागCrimeगुन्हा