शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

PNB SCAM: मोठी बातमी! नीरव मोदीच्या बहिणीनं इंग्लंडमधील बँक खात्यातून भारत सरकारला पाठवले 17.25 कोटी रुपये

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2021 19:09 IST

Nirav Modi : इग्लंडच्या गृहमंत्री प्रीती पटेल यांनी एप्रिल महिन्यात नीरव मोदीचे भारताकडे प्रत्यर्पण करण्याचा आदेश दिला होता.

नवी दिल्ली - पंजाब नॅशनल बँक घोटाळाप्रकरणी नीरव मोदीची बहीण आणि सरकारी साक्षीदार पूर्वीने (Purvi Modi) आपल्या इंग्लंडमधील बँक खात्यातील 17.25 कोटी रुपये भारत सरकारला पाठवले आहेत. अंमलबजावणी संचालनालयाने (ED) निवेदन जारी करून यासंदर्भात माहिती दिली आहे. (pnb scam ED says Nirav Modi sister Purvi Modi remitted approx 17. 25 crore to indian government)

यापूर्वी, इग्लंडच्या न्यायालयाने भारतातील पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील फरार हिरे व्यापारी नीरव मोदीला मोठा झाटका दिला आहे. यूके हायकोर्टाने 23 जूनला, नीरव मोदीने भारताकडे प्रत्यर्पण करण्याविरोधात केलेला अर्ज फेटाळून लावला आहे. महत्वाचे म्हणजे, इग्लंडच्या गृहमंत्री प्रीती पटेल यांनी एप्रिल महिन्यात नीरव मोदीचे भारताकडे प्रत्यर्पण करण्याचा आदेश दिला होता.

उल्लेखनीय आहे, की मेहुल चोकसी आणि नीरव मोदी यांच्यावर काही बँक अधिकाऱ्यांसोबत संगनमत करून 13,500 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. सध्या नीरव मोदी लंडनमधील एका कारागृहात कैद आहे. तर चोकसी डोमिनिकाच्या कारागृहात बंद आहे. या दोघांविरोधात केंद्रीय अन्वेषण संस्था सीबीआय चौकशी करत आहे आणि त्यांना भारतात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे.

मेहुल चोक्सीला आणण्याची जोरदार तयारी -भारतातून परदेशात पळून गेलेल्या मेहुल चोक्सीच्या प्रत्यार्पणासाठीही जोरदार प्रयत्न सुरू आहेत. डॉमिनिका सरकारने तर मेहुल चोक्सीला भारतात पाठवून देण्याची भूमिका घेतली आहे. तसेच, डॉमिनिकाच्या तुरुंगातून जामीन मिळवण्यासाठी प्रयत्न करत असलेल्या मेहुल चोक्सीला डॉमिनिका सरकारने घुसखोर म्हणूनही जाहीर केले आहे. भारतीय अधिकाऱ्यांनी डॉमिनिका उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करत मेहुल चोक्सी अद्यापही भारताचा नागरिक असल्याची ठाम भूमिका मांडली आहे. 

टॅग्स :Nirav Modiनीरव मोदीEnglandइंग्लंडEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयCentral Governmentकेंद्र सरकार