पंतप्रधानांचा आज राजीनामा
By Admin | Updated: May 17, 2014 03:43 IST2014-05-17T03:43:46+5:302014-05-17T03:43:46+5:30
भाजपाचे नेत्रदीपक यश आणि काँग्रेसचा दारुण पराभव यासोबतच उद्या शनिवारी काँग्रेसप्रणीत संयुक्त पुरोगामी सरकारच्या सलग १० वर्षांच्या सत्तेची अखेर होईल़

पंतप्रधानांचा आज राजीनामा
नवी दिल्ली : भाजपाचे नेत्रदीपक यश आणि काँग्रेसचा दारुण पराभव यासोबतच उद्या शनिवारी काँग्रेसप्रणीत संयुक्त पुरोगामी सरकारच्या सलग १० वर्षांच्या सत्तेची अखेर होईल़ पंतप्रधान मनमोहन सिंग शनिवारी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना भेटून, त्यांना आपल्या सरकारचा राजीनामा सादर करतील़ शुक्रवारी पंतप्रधानांनी राष्ट्रपतींकडे वेळ मागितला़ राष्ट्रपतींनी त्यांना उद्या शनिवारी दुपारी १२.४५ वाजताची वेळ दिली आहे़ राष्ट्रपतींना भेटल्यानंतर लगेच मनमोहन सिंग राष्ट्राला संबोधित करतील़ तत्पूर्वी सकाळी पंतप्रधान मंत्रिमंडळाची बैठक घेतील़ त्यांच्या वतीने मंत्रिमंडळाच्या सर्व सदस्यांसाठी चहापानाचे आयोजन करण्यात येईल़ यापश्चात राष्ट्रपतींच्या वतीने पंतप्रधानांसाठी रात्रीची मेजवानी दिली जाईल़ याच दिवशी पंतप्रधान ७, रेसकोर्स रोड येथील अधिकृत निवासस्थान सोडून आपल्या नव्या बंगल्यात राहण्यास जातील़