शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
2
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
3
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
4
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले
5
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
6
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
7
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
8
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
9
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
10
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
11
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
12
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
13
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
14
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
15
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
16
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
17
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
18
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
19
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
20
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी

PM Modi Security Breach: सुरक्षेतील त्रुटीनंतर PM मोदींनी घेतली राष्ट्रपतींची भेट, सांगितलं नेमकं काय घडलं

By ऑनलाइन लोकमत | Published: January 06, 2022 2:44 PM

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज राष्ट्रपती भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि काल पंजाबमध्ये त्यांच्या दौऱ्यात झालेल्या सुरक्षेतील त्रुटींसंदर्भात माहिती घेतली.

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्यात झालेल्या सुरक्षेतील त्रुटींबद्दल राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनीही चिंता व्यक्त केली आहे. आज पंतप्रधान मोदींनी या संदर्भात राष्ट्रपती कोविंद यांची भेट घेतली. याशिवाय, उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनीही या प्रकरणावर पंतप्रधान मोदींशी चर्चा केली आहे.  (President Ramnath Kovind met prime minister Narendra Modi)

पंतप्रधानांच्या सुरक्षेतील या त्रुटीबद्दल गंभीर चिंता व्यक्त करत, उपराष्ट्रपती म्हणाले, सुरक्षा प्रोटोकॉलचे काटेकोर पालन सुनिश्चित करण्यासाठी कठोर पावले उचने आवश्यक आहे, जेणेकरून भविष्यात अशा त्रुटी पुन्हा होणार नाहीत.

राष्ट्रपती कोविंद यांनी घेतली सुरक्षेतील त्रुटिंची संपूर्ण माहिती - राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या ट्विटर हँडलवरून या बैठकीसंदर्भात माहिती देण्यात आली आहे. या ट्विटमध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो पोस्ट करत लिहिन्यात आले आहे, की ''राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज राष्ट्रपती भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि काल पंजाबमध्ये त्यांच्या दौऱ्यात झालेल्या सुरक्षेतील त्रुटींसंदर्भात माहिती घेतली. राष्ट्रपतींनी या गंभीर चुकीसंदर्भात चिंता व्यक्त केली आहे.''

चन्नी सरकारकडून उच्चस्तरीय समितीही स्थापन -पंतप्रधान मोदींच्या सुरक्षिततेतील त्रुटींच्या मुद्द्यावर पंजाबमधील चन्नी सरकारवर टीकेची झोड उठली आहे. आता या प्रकरणाच्या चौकशीसाठी चन्नी सरकारने उच्चस्तरीय समितीही स्थापन केली आहे. ही समिती तीन दिवसांत आपला अहवाल तयार करेल. एका अधिकृत प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, या समितीत निवृत्त न्यायमूर्ती मेहताब सिंग गिल आणि प्रधान सचिव (गृह व्यवहार आणि न्याय) अनुराग वर्मा यांचा समावेश आहे.

सर्वोच्च न्यायालयात पोहोचले प्रकरण -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेतील त्रुटीचे प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहे. सरन्यायाधीश एन.व्ही. रमण्णा यांच्या खंडपीठासमोर मांडण्यात आली आहे. या प्रकरणावर शुक्रवारी (7 जानेवारी) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. या याचिकेत पंजाब सरकारला योग्य निर्देश देऊन जबाबदार असलेल्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. याशिवाय पुन्हा भविष्यात अशा प्रकारच्या घटना रोखण्याची मागणीही याचिकेत करण्यात आली आहे.

भाजप नेत्यांनी घेतली राज्यपालांची भेट -तत्पूर्वी, भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी गुरुवारी पंजाबच्या राज्यपालांची भेट घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेतील त्रुटींचा मुद्दा उपस्थित केला. पंजाब भाजपच्या नेत्यांनी राज्यपालांकडे गृहमंत्री आणि डीजीपी यांना बडतर्फ करण्याची मागणी केली आहे.

नेमकं काय घडलं होतं? -पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी पंजाब दौऱ्यावर होते. येथे कारने हुसैनीवाला येथे जात असताना आणि हुसैनीवाला शहीद स्मारक 30 किलोमीटर अंतरावर असताना, एका फ्लायओव्हरवर पंतप्रधानांचा ताफा पोहोचल्यानंतर शेतकरी आंदोलकांनी अचानकपणे रस्ता अडविला. जवळपास 15 ते 20 मिनिटे पंतप्रधानांचा ताफा अडविण्यात आला. यानंतर, हुसैनीवाला येथे जाणे रद्द करून पंतप्रधानांचा ताफा भटिंडा येथे परतला आणि भटिंडा येथून विमानाने पंतप्रधान दिल्लीला रवाना झाले होते. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRamnath Kovindरामनाथ कोविंदPunjabपंजाबVenkaiah Naiduव्यंकय्या नायडू