सुवर्णसंधी! देशातील तब्बल 10 लाख तरुणांना मिळणार नोकरी; जाणून घ्या कसा, कुठे करायचा अर्ज?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2022 12:57 IST2022-11-29T12:56:38+5:302022-11-29T12:57:54+5:30
PM Rojgar Mela 2022 : केंद्र सरकारच्या विविध सरकारी विभागांमध्ये 10 लाख भरती होणार आहे. पंतप्रधान मोदींनी 75000 तरुणांना नियुक्तीपत्रे देऊन त्याची सुरुवात केली.

सुवर्णसंधी! देशातील तब्बल 10 लाख तरुणांना मिळणार नोकरी; जाणून घ्या कसा, कुठे करायचा अर्ज?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 ऑक्टोबर रोजी पीएम रोजगार मेळावा सुरू केला होता. याद्वारे केंद्र सरकारच्या विविध सरकारी विभागांमध्ये 10 लाख भरती होणार आहे. पंतप्रधान मोदींनी 75000 तरुणांना नियुक्तीपत्रे देऊन त्याची सुरुवात केली. यानंतर, यापूर्वी सीआयएसएफसह इतर अनेक विभागांमध्ये भरती झालेल्या तरुणांना नियुक्तीपत्रे देण्यात आली. येत्या 18 महिन्यांत 10 लाख तरुणांना रोजगार देण्याचे सरकारचे लक्ष्य आहे.
पंतप्रधान मोदींनी सर्वप्रथम जून 2022 मध्ये होणाऱ्या रोजगार मेळाव्याबाबत सर्व मंत्रालये आणि विभागांना सूचना दिल्या. रोजगार मेळाव्याद्वारे 38 मंत्रालये आणि विभागांमध्ये भरती केली जात आहे. केंद्रीय सशस्त्र पोलीस दल, प्राप्तिकर विभागासह विविध विभागांमध्ये ही भरती सुरू आहे.
रिपोर्टनुसार, केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये 2023 च्या अखेरीस गट अ श्रेणीतील एकूण 2386, गट ब मधील 25836 आणि गट क मधील 7.6 लाख रिक्त जागा भरल्या जातील. विविध शासकीय विभागांतर्गत एकूण 10 लाख पदे एकत्रितपणे भरण्यात येणार आहेत.
पंतप्रधान रोजगार मेळाव्यासाठी अर्ज कसा करावा?
पीएम रोजगार मेळाव्याची माहिती यूपीएससी, एसएससी इत्यादी विविध भरती मंडळांवर उपलब्ध असेल.
पीएम रोजगार मेळावा 2022 ची लिंक भर्ती बोर्डाच्या वेबसाइटवर मिळेल.
पीएम रोजगार मेळावा 2022 च्या लिंकवर जाऊन रजिस्ट्रेशन करावं लागेल.
पंतप्रधान रोजगार मेळाव्यासाठी कोण करू शकतो अर्ज?
पंतप्रधान रोजगार मेळाव्यासाठी उमेदवारांचे वय 18 ते 29 वर्षे असावे.
उमेदवार हा भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे.
उमेदवारास संबंधित विषयात बॅचलर डिग्री / 10वी, 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
उमेदवारांचा कोणताही गुन्हेगारी रेकॉर्ड नसावा. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"