शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नादच खुळा... रामदास आठवलेंची शपथही ठरली सर्व मंत्र्यांपेक्षा वेगळी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2019 22:31 IST

'नमो 2.0' च्या शपथविधी सोहळ्यातही रामदास आठवले यांचं वेगळेपण प्रकर्षाने जाणवलं.

ठळक मुद्देराष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सगळ्यात आधी नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली.रामदास आठवले वगळता सर्वांनी 'मैं ईश्वर की शपथ लेता हूं...'  असं म्हटलं.आठवलेंनी मात्र 'मैं रामदास आठवले सत्यनिष्ठा से प्रतिज्ञा करता हूं...' अशी शपथ घेतली

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले आपल्या भन्नाट कवितांसाठी ओळखले जातातच, पण ते आपल्या पेहेरावातून, आविर्भावातून आपलं वेगळेपणही दाखवून देत असतात. राष्ट्रपती भवनाच्या भव्य प्रांगणात, हजारो मान्यवरांसमोर झालेल्या 'नमो 2.0' च्या शपथविधी सोहळ्यातही त्यांचं हे वेगळेपण प्रकर्षाने जाणवलं.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सगळ्यात आधी नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली. त्यानंतर कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री स्वतंत्र कार्यभार आणि शेवटी राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली. रामदास आठवले वगळता सर्वांनी 'मैं ईश्वर की शपथ लेता हूं...'  असं म्हटलं. परंतु, आठवलेंनी 'मैं रामदास आठवले सत्यनिष्ठा से प्रतिज्ञा करता हूं...' अशी शपथ घेतली आणि स्वाभाविकच ती इतरांपेक्षा हटके ठरली. याशिवाय, लोक जनशक्ती पार्टीचे(लोजपा) प्रमुख रामविलास पासवान यांनी सुद्धा 'मैं ईश्वर की शपथ लेता हूं...'  असं म्हटलं नाही. तर त्यांनीही 'मैं रामविलास पासवान सत्यनिष्ठा से प्रतिज्ञा करता हूं...' असं म्हणत शपथ घेतली.  

नरेंद्र मोदी संघ स्वयंसेवक असल्यापासूनचे त्यांचे मित्र तेलंगणातील खासदार जी. किशन रेड्डी यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर 'भारत माता की जय' असा खणखणीत नारा दिला, तोही लक्षवेधी ठरला. 

दक्षिण मुंबईतून निवडून आलेले शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी केंद्रीय मंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांचं नाव कालच निश्चित झालं होतं. तमाम शिवसैनिकांना त्यांच्या शपथेबद्दल उत्सुकता होती. बहुतांश शिवसेना खासदारांनी मराठीत शपथ घेण्याचं जाहीर केल्यानं अरविंद सावंत मंत्रिपदाची शपथही मराठीत घेतील, असं अनेकांना वाटलं होतं. पण, सावंत यांनी हिंदीत शपथ घेतली.

    

टॅग्स :pm modi swearing-in ceremonyनरेंद्र मोदी शपथविधीRamdas Athawaleरामदास आठवलेArvind Sawantअरविंद सावंतNarendra Modiनरेंद्र मोदी