पंडित नेहरूंचा कोणता विक्रम मोडणार पंतप्रधान नरेंद्र मोदी? रामदास आठवले यांनी केली मोठी भविष्यवाणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2025 09:27 IST2025-03-30T09:25:03+5:302025-03-30T09:27:00+5:30
"आज बौद्ध धर्माचे अनुयायी 80 देशांमध्ये पसरलेले आहेत. मंदिर चालवणाऱ्या ट्रस्टमध्ये इतर धर्मांचे अनेक सदस्य आहेत. याचे त्यांना दुःख होणे स्वाभाविक आहे."

पंडित नेहरूंचा कोणता विक्रम मोडणार पंतप्रधान नरेंद्र मोदी? रामदास आठवले यांनी केली मोठी भविष्यवाणी
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी शनिवार (29 मार्च) पंडित जवाहरलाल नेहरू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात मोठे विधान केले. पंतप्रधान नरेंद्र मोदीहे जवाहरलाल नेहरू यांचा विक्रम मोडून सलग चौथ्यांदा देशाचे पंतप्रधान होतील, अशी भविष्यवाणी आठवले यांनी केली आहे. एवढेच नाही तर जद (यू) अध्यक्ष ठणठणीत असून ते कीमान 5 ते 10 वर्षांपर्यंत सत्तेवर राहतील, असा दावाही आठवले यांनी केला. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) प्रमुख रामदास आठवले तीन दिवसीय बिहार दौऱ्यावर आहेत. दरम्यान मुख्यमंत्री नितीश कुमार यांची भेट घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
आठवले म्हणाले, “पंतप्रधान मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा सत्तेवर येत नेहरूंची बरोबर केली आहे. मला विश्वास आहे की, ते नेरूंचा विक्रम मोडतील आणि सलग चौथ्यांदा सत्तेवर येतील.” याच बरोबर, “एक बौद्ध म्हणून, मी बिहारचा खूप सन्मान करतो. याच भूमीवर गौतम बुध्दांनी 2500 वर्षांपेक्षाही पूर्वी ज्ञान प्राप्त केले होते.”
आठवले पुढे म्हणाले, “मी गेल्या एक महिन्यांपासून बोधगया येथे निदर्शन करणाऱ्या बौद्ध समाजाची चिंता दूर करण्यासंदर्भातही नितीश कुमार यांच्यासोबत चर्चा केली. काल मी स्वतः निदर्शकांना भेटलो होतो. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना या संदर्भात चौकशीचे आदेश दिले आहेत. आठवले म्हणाले, नितीश अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये रेल्वेमंत्री होते, तेव्हापासून मी त्यांना ओळखतो. त्यांची प्रकृती ठणठणीत आहे.
खरे तर, युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांपैकी एक असलेल्या महाबोधीच्या नियंत्रणाचा संपूर्ण अधिकार मिळावा, अशी मागमी करत बौद्ध बंधूंचे निदर्शन सुरू आहे. त्यांची भेट घेतल्यानंतर आठवले म्हणाले, आपण हा मुद्दा मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याकडे उपस्थित केला आहे. आज बौद्ध धर्माचे अनुयायी 80 देशांमध्ये पसरलेले आहेत. मंदिर चालवणाऱ्या ट्रस्टमध्ये इतर धर्मांचे अनेक सदस्य आहेत. याचे त्यांना दुःख होणे स्वाभाविक आहे. हे 1950 च्या दशकात राज्य सरकारने संमत केलेल्या एका कायद्यामुळे झाले आहे.