...म्हणून पंतप्रधान मोदींनी परिचारिकांसोबत केला 'विनोद', एम्सच्या संचालकांनी संगितलं नेमकं कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2021 05:32 PM2021-03-01T17:32:42+5:302021-03-01T17:37:43+5:30

प्रतप्रधानांनी लस टोचून घेणे गेमचेन्जर असल्याचे म्हणत, ''मला विश्वास आहे, की लोक मोठ्या संख्येने लस टोचून घेतील. यासाठी सरकारी आणि खासगी केंद्रही तयार करण्यात आले आहेत. एकट्या एम्समध्येच लसिकरणासाटी पाच केंद्र तयार करण्यात आली आहेत. (aiims director dr randeep guleria)

PM Narendra Modi wanted to put the nursing officers at ease and therefore he joked says aiims director dr randeep guleria | ...म्हणून पंतप्रधान मोदींनी परिचारिकांसोबत केला 'विनोद', एम्सच्या संचालकांनी संगितलं नेमकं कारण

...म्हणून पंतप्रधान मोदींनी परिचारिकांसोबत केला 'विनोद', एम्सच्या संचालकांनी संगितलं नेमकं कारण

googlenewsNext
ठळक मुद्देपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजधानी दिल्लीतील एम्स रुग्णालयात आज कोरोना लशीचा पहिला डोस घेतला. यावेळी त्यांच्यासोबत एम्सचे संचालक रणदीप गुलेरियादेखील उपस्थित होते.यावेळी पंतप्रधान मोदींनी परिचारिकांसोबत त्यांच्या भाषेत संवाद साधला

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजधानी दिल्लीतील एम्स रुग्णालयात आज कोरोना लशीचा पहिला डोस घेतला. यावेळी त्यांच्यासोबत एम्सचे संचालक रणदीप गुलेरियादेखील (Randeep Guleria) उपस्थित होते. यावेळी लस टोचण्यापूर्वी रुग्णालयातील परिचारिकांचं टेन्शन कमी करण्यासाठी पंतप्रधान मोदींनी (PM Narendra Modi) त्यांच्यासोबत त्यांच्याच भाषेत संवाद साधला आणि विनोदही ऐकवला, असे रणदीप गुलेरिया यांनी सांगितले. (PM Narendra Modi wanted to put the nursing officers at ease and therefore he joked says aiims director dr randeep guleria)

गुलेरिया म्हणाले, "लस टोचण्यापूर्वी नरसिंग ऑफिसर्सचे टेन्शन दूर करण्याची पंतप्रधान मोदींची इच्छा होती. यासाठी त्यांनी त्यांना विनोदही ऐकवला. त्यांच्याशी त्यांच्याच भेषेतून संवाद साधला आणि कोण कुठून आहे, असे विचारले. यामुळे बरीच मदत मिळाली. कारण कुणाला लस टोचायची हे परिचारिकांना माहीत नव्हते.''

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली कोरोना लस; ट्विटद्वारे जनतेला आवाहन करत म्हणाले…

प्रतप्रधानांनी लस टोचून घेणे गेमचेन्जर असल्याचे म्हणत, ''मला विश्वास आहे, की लोक मोठ्या संख्येने लस टोचून घेतील. यासाठी सरकारी आणि खासगी केंद्रही तयार करण्यात आले आहेत. एकट्या एम्समध्येच लसिकरणासाटी पाच केंद्र तयार करण्यात आली आहेत.

गुलेरिया म्हणाले, ज्येष्ठ नागरिक आणि इतर आजारांनी ग्रस्त 45 वर्षांहून अधिक वय असलेल्या नागरिकांच्या लसिकरण अभियानाला सुरुवात होताच, पहिल्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पहिलाच डोस घेतल्याने लोकांच्या मनातील लशीसंदर्भातील भीती दूर व्हायला हवी. मोदींनी सोमवारी सकाळी भारत बायोटेकने तयार केलेल्या स्वदेशी लशीचा डोस घेतला.

कोरोनाची लस टोचून घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी नर्सला म्हणाले...

गुलेरिया यांनी सांगितले, की पंतप्रधानांच्या लसिकरणासंदर्भात एम्सला रविवारी रात्री उशिरा माहिती मिळाली होती. त्यांच्यासाठी कसल्याही प्रकारची विशेष व्यवस्था करण्यात आली नव्हती. कारण सोमवारी कामकाजाचा दिवस असल्याने, या दिवशी रुग्णालयात येणाऱ्या इतर रुग्णांना कसल्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून, पंतप्रधानांनी सकाळी लवकर लस टोचून घेण्याचा निर्णय घेतला होता.
 

Web Title: PM Narendra Modi wanted to put the nursing officers at ease and therefore he joked says aiims director dr randeep guleria

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.