पंतप्रधान नरेंद्र मोदी 21 आणि 22 डिसेंबरला गुजरातच्या दौऱ्यावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2018 18:32 IST2018-12-19T18:30:07+5:302018-12-19T18:32:35+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी 21 डिसेंबर आणि 22 डिसेंबरला गुजरातच्या दोन दिवसीय दौऱ्यावर असणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी 21 आणि 22 डिसेंबरला गुजरातच्या दौऱ्यावर
अहमदाबाद - पंतप्रधान नरेंद्र मोदी 21 डिसेंबर आणि 22 डिसेंबरला गुजरातच्या दोन दिवसीय दौऱ्यावर असणार आहेत. या दौऱ्यादरम्यान ते राज्यातील पोलीस प्रमुख्यांच्या वार्षिक परिषदेत सहभागी होणार आहेत. शिवाय, येथे भाजपाच्या महिला मोर्चाच्या कार्यकर्त्यांनाही संबोधित करतील. येथील अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे.
याबाबत एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, 20 डिसेंबरपासून पोलीस महानिदेशक / पोलीस महानिरीक्षकांच्या अखिल भारतीय संमेलन सुरू होत आहे. नर्मदा जिल्ह्यातील स्टॅच्यू ऑफ युनिटीजवळ या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले आहे.
केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत 20 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या या तीन दिवसीय संमेलनाचा शुभारंभ करण्यात येणार आहे. 21 डिसेंबरला पंतप्रधान मोदी या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.