शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
3
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
4
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
5
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
6
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
7
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
8
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
9
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
10
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
11
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
12
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
13
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
14
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
15
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
16
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
17
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
18
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
20
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की

पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑक्टोबरमध्ये केदारनाथ दौऱ्यावर?  PMO ची टीम उत्तराखंडमध्ये दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2021 12:42 IST

narendra modi : विशेष म्हणजे, केदारनाथ धामच्या नवनिर्माणच्या दृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदींची ही भेट देखील महत्त्वपूर्ण असू शकते.

डेहराडून : उत्तराखंडमधील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय हालचाली वाढण्याची शक्यता आहे. ऑक्टोबर महिन्यात भाजपाचे प्रमुख नेते उत्तराखंडला पोहोचतील. यातच ऑक्टोबर महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उत्तराखंडमधील केदारनाथ दौऱ्यावर असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. येथील कार्याचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान कार्यालयाची (पीएमओ) एक टीम केदारनाथला पोहोचली आहे. (pm narendra modi visit to kedarnath possible in october pmo team reached)

पंतप्रधान कार्यालयाचे सल्लागार भास्कर खुल्बे, आयएएस मंगेश घिल्डियाल इतर अधिकाऱ्यांसह केदारनाथला पोहोचले आहेत. ही टीम गुरुवारी दुपारी 12 वाजेपर्यंत येथील कामांची व व्यवस्थेची पाहणी करतील. दरम्यान, 6 ऑक्टोबरनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी केदारनाथला भेट देऊ शकतात, असे सांगितले जात आहे.

दरम्यान, न्यूज 18 ने दिलेल्या माहितीनुसार, आगामी निवडणुकीच्या हालचालींचा भाग म्हणून भाजपा ऑक्टोबर महिन्यात पार्टीच्या प्रमुख नेत्यांसाठी उत्तराखंडला भेट देण्याची योजना आखत आहे. सध्या पंतप्रधान, गृहमंत्री आणि संरक्षण मंत्री यांच्या भेटींचे ठिकाण, दिवस आणि वेळ याबद्दल एक रूपरेषा तयार केली जात आहे. 

या रुपरेषेअंतर्गत, केदारनाथमधील व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान कार्यालयाची टीम पोहचली आहे, ज्यामुळे असे मानले जाते की, पंतप्रधान नरेंद्र मोदी येथे येणार आहेत. विशेष म्हणजे, केदारनाथ धामच्या नवनिर्माणच्या दृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदींची ही भेट देखील महत्त्वपूर्ण असू शकते.

अमित शाह 16-17 ऑक्टोबरला दौऱ्यावर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह 1 ऑक्टोबर रोजी उत्तराखंडला भेट देणार आहेत, असे सांगितले जात आहे. तर अमित शाह 16-17 ऑक्टोबर रोजी डेहराडून आणि हरिद्वार दौऱ्याची तयारी करत आहेत. पंतप्रधान, संरक्षण मंत्री, गृहमंत्री यांच्या दौऱ्यातील सर्वात महत्वाचे म्हणजे गृहमंत्री अमित शहा यांचा दौरा मानला जात आहे, ज्यामध्ये हरिद्वारमध्ये संतांना भेटतील आणि निवडणुकीचा मूड देखील जाणून घेतील. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीKedarnathकेदारनाथBJPभाजपा