Sushant Singh Rajput Suicide : त्याच्यामुळे अनेकांना प्रेरणा मिळाली, अन् मृत्यूनं धक्काच बसला; मोदींनाही दु:ख अनावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2020 17:47 IST2020-06-14T17:44:06+5:302020-06-14T17:47:47+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुशांतसिंग राजपूत याच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.

pm narendra modi twitter reaction on sushant singh rajput suicide | Sushant Singh Rajput Suicide : त्याच्यामुळे अनेकांना प्रेरणा मिळाली, अन् मृत्यूनं धक्काच बसला; मोदींनाही दु:ख अनावर

Sushant Singh Rajput Suicide : त्याच्यामुळे अनेकांना प्रेरणा मिळाली, अन् मृत्यूनं धक्काच बसला; मोदींनाही दु:ख अनावर

नवी दिल्लीः बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूतने आत्महत्या केल्यानं एकच खळबळ उडाली आहे.  सुशांतसिंग राजपूत याच्या मृत्यूनं संपूर्ण चित्रपटसृष्टी शोकसागरात बुडाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुशांतसिंग राजपूत याच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. पीएम मोदी यांनी ट्वीट करत त्याला श्रद्धांजली अर्पण केली आहे. सुशांत सिंग राजपूत ... एक प्रतिभावान तरुण अभिनेता लवकरच निघून गेला. त्याच्या अभिनयाने बर्‍याच लोकांना प्रेरणा मिळाली. त्याने अनेक संस्मरणीय परफॉर्मन्स मागे ठेवले. त्याच्या मृत्यूबद्दल धक्का बसला. मी त्याचे कुटुंबीय आणि चाहत्यांबरोबरच दुःखात सहभागी आहे. ओम शांती .. ', असं म्हणत मोदींनी सुशांतसिंग राजपूतला श्रद्धांजली अर्पण केली आहे.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतने आज मुंबईतील आपल्या घरी गळफास लावत आत्महत्या केली. त्याचा नोकर आणि मित्रांनी पोलिसांना माहिती दिली. सुशांतने आत्महत्या का केली, याचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.  हिंदी चित्रपट अभिनेता सुशांत सिंग राजपूत यांच्या निधनाची बातमी धक्कादायक आहे. त्यांची अभिनय क्षमता, कौशल्य सर्वज्ञात होते. त्याचे निधन वेदनादायी आहे आणि ते चित्रपटसृष्टीसाठी एक मोठे नुकसान आहे. देव त्याच्या कुटुंबीयांना आणि चाहत्यांना हे दुःख सहन करण्याचे सामर्थ्य देवो, अशी श्रद्धांजली राजनाथ सिंह यांनी वाहिली आहे. सुशांत सिंग राजपूत यांच्या निधनाबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही शोक व्यक्त केला. उद्धव ठाकरे यांनी ट्विट केले की, 'सुशांत सिंग राजपूत यांच्या आकस्मिक निधनाबद्दल ऐकून आश्चर्य आणि दुःख झाले. देव त्याचे कुटुंब, चाहते आणि प्रियजनांना सामर्थ्य देवो.

Web Title: pm narendra modi twitter reaction on sushant singh rajput suicide