शहरं
Join us  
Trending Stories
1
१३ चेंडूंत चोपल्या ६४ धावा! 'Virat' पराक्रम करताना चौकार-षटकारांचा पाऊस, थोडक्यात हुकले शतक
2
Air India च्या कर्मचाऱ्यांचा संप मागे; हकालपट्टी झालेल्या 25 कर्मचाऱ्यांना कामावर परत घेणार...
3
विराट कोहलीला शतकाची हुलकावणी, पण RCB ची आतषबाजी; PBKS समोर २४२ धावांचे लक्ष्य
4
मतदान झालं, बारामतीत लीड कोणाला?; सुनेत्रा पवारांच्या विजयाबद्दल अजित पवार म्हणाले...
5
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
6
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
7
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
8
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
9
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
10
फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट, 8 ठार, 3 गंभीर; शिवकाशीत भीषण दुर्घटना
11
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
12
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
13
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
14
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 
15
महिला डॉक्टरचा पाठलाग अन् सातत्याने मिस कॉल; आरोपीला ठोकल्या बेड्या
16
श्रीलंकेने वर्ल्ड कप स्पर्धेसाठी वनिंदू हसरंगाच्या नेतृत्त्वाखाली तगडा संघ उतरवला; CSK, MI ला दिला धक्का 
17
'12th Fail' फेम विक्रांत मेसीने टॅक्सी ड्रायव्हरला केली शिवीगाळ? अभिनेत्यावर गंभीर आरोप, व्हिडिओ व्हायरल
18
मोठी बातमी : एक चूक काय झाली, LSG च्या मालकांनी लोकेश राहुलच्या हकालपट्टीची तयारी सुरू केली
19
"निवडणूक प्रचार हा मूलभूत अधिकार नाही", केजरीवाल यांच्या जामीन अर्जाला ईडीचा विरोध
20
विराट कोहलीला पंजाबविरूद्धच्या सामन्यात मोठ्या विक्रमाची संधी; ठरू शकतो पहिलाच भारतीय!

PM Narendra Modi Speech in Lok Sabha: 'शेतकऱ्यांपर्यंत सत्य पोहचलं तर...'; नरेंद्र मोदींनी आज पुन्हा कृषी कायद्यावर माडलं परखड मत

By मुकेश चव्हाण | Published: February 10, 2021 5:35 PM

कृषी कायदा लागू झाल्यानंतर एमएसपीची खरेदी आणखी वाढली असल्याचा दावा नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत केला. 

नवी दिल्ली: लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर धन्यवाद प्रस्तावावर चर्चा पूर्ण झाल्यानंतर आज पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. शेतकरी आंदोलन आणि कृषी कायद्यांवर नरेंद्र मोदी बोलताना विरोधकांनी मोठा गदारोळ करण्याचा प्रयत्न केला. मात्र कृषी कायदा लागू झाल्यानंतर एमएसपीची खरेदी आणखी वाढली असल्याचा दावा नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत केला. 

नरेंद्र मोदी म्हणाले की, कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्यांचा फायदा व्हावा हा हेतू आहे. कृषी कायदा लागू झाल्यानंतर बाजारपेठा, एमएसपी बंद झाली नाही. उलट एमएसपीची खरेदी आणखी वाढल्याचे दिसून येत आहे. मात्र कृषी कायद्याबाबत खोटं पसरवलं जात आहे. यामध्ये अडथळे आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. शेतकऱ्यांपर्यंत याबाबत सत्य पोहचलं तर भांडाफोड होईल. त्यामुळे गोंधळ घातला जात आहे, अशी टीका नरेंद्र मोदी यांनी केली आहे. तसेच अशाने तुम्ही लोकांचा विश्वास जिंकू शकणार नाही, असंही नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितले. 

माझ्या भाषणांमध्ये अडथळे निर्माण करणे हे एक सुनियोजित षडयंत्र असल्याचेही नरेंद्र मोदी यांनी सांगितले. तसेच काँग्रेसवाल्यांनी कृषी कायद्याच्या कलरपेक्षा कन्टेन्टवर चर्चा करणं जास्त गरजेचं होतं, अशी टीका नरेंद्र मोदी यांनी केली आहे. 

डॉक्टर, नर्सच्या रुपात देव आला होता- 

मी म्हणतो डॉक्टर, नर्सच्या रुपात देव आला होता. डॉक्टर, नर्स, सफाई कर्मचारी मृत्यूशी खेळत होते. मुलांना घरी ठेवून येत होते. त्यांच्या रुपात देव पावला, असे मोदी यांनी सांगितले. परदेशांमध्ये लाखो-करोडो डॉलर तिजोरीत पडून होते. त्यांना त्यांचे नागरिक वाचविता आले नाहीत. पण आपण आत्मनिर्भर झालो, असे मोदी म्हणाले. आधारविरोधात अनेक जण न्यायालयात गेले होते. मी आज यावर बोलणार आहे. आधारमुळे आज कोरोनाकाळात आम्ही जनधन, शेतकरी, पदपथवाले अशा अनेकांच्या खात्यात मदत पोहोचवली. आज आपल्याकडे विक्रमी जीएसटी जमा झाला आहे. ट्रॅक्टर, गाड्यांचा विक्रमी सेल झाला आहे. तीन कृषी कायदे आणले, शेतकऱ्यांसाठी वेगवेगळे प्रयत्न करत राहणे गरजेचे आहे, असे मोदी म्हणाले.

शरद पवार यांच्या जुन्या वक्तव्यांचा आधार घेत मोदींनी विरोधकांना घेरलं-

आपल्या भाषणा दरम्यान नरेंद्र मोदी यांनी युपीएमध्ये कृषी मंत्री असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या जुन्या वक्तव्यांचा आधार घेत विरोधकांना घेरलं. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्या त्या वक्तव्यांचा आधार घेतला ज्यात त्यांनी एपीएमसी अॅक्टमध्ये बदल आणि काही खासगी मंडयांचं समर्थ केलं होतं. "विरोधी पक्षांचं सरकार ज्या राज्यांमध्ये आहे त्या राज्यांत कोणते ना कोणते रिफॉर्म्स करण्यात आले आहेत. आम्ही ते आहोत ज्यांनी १५०० कायदे संपवले आहेत. आम्ही प्रोगरेसिव्ह पॉलिटिक्सवर विश्वास करतो. भोजपुरीमध्ये एक म्हण आहे काही लोकं तशी आहेत ना खेलब, ना खेलन देब, खेलबे बिगाडब," असं म्हणत मोदींनी विरोधकांवर निशाणा साधला.

“एपीएमसी कायदा बदलल्याचं कोण अभिमानानं सांगत होतं, २४ बाजार उपलब्ध झाल्याचं कोण सांगत होतं? हे तर तत्कालिन युपीए सरकारमधील कृषीमंत्री शरद पवार बोलत होते. शरद पवार आज अचानक उलट बोलत आहेत. शेतकऱ्यांमध्ये भ्रम निर्माण करण्यासाठी हा रस्ता निवडण्याची शंका येते," असं पंतप्रधान यावेळी म्हणाले. यावेळी सुप्रिया सुळे देखील याच ठिकाणी उपस्थित होत्या.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीFarmers Protestशेतकरी आंदोलनcongressकाँग्रेसIndiaभारतBJPभाजपाagricultureशेती