शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

लोकशाहीचा गळा घोटणारे आज लोकशाही वाचवण्याची भाषा करताहेत- मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2019 15:37 IST

कोलकात्यातील विरोधी पक्षांच्या महारॅलीवर मोदींचा हल्लाबोल

सिल्वासा: विरोधकांची आघाडी माझ्याविरोधात नव्हे, तर देशवासीयांच्या विरोधात आहे, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांना लक्ष्य केलं आहे. आमचं सरकार एका कुटुंबासाठी काम करत नाही. ते 130 कोटी देशवासीयांसाठी काम करतं. लोकशाहीचा गळा घोटणारे आज लोकशाही वाचवण्याची भाषा करताहेत, अशा शब्दांमध्ये त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. कोलकात्यात आज तृणमूल, काँग्रेस यांच्यासह एकूण 22 पक्षांची महारॅली आहे. विरोधकांच्या या एकजुटीवर मोदींनी जोरदार टीका केली आहे. मोदी आज विविध कार्यक्रमांसाठी  सिल्वासात आहेत.भाजपामुळे आज पश्चिम बंगालमध्ये सर्व भ्रष्ट राजकीय पक्ष एकत्र आले आहेत. आम्ही भ्रष्टाचारविरोधी मोहीम सुरू करताच काँग्रेसला भीती वाटू लागली आणि महाआघाडीचे प्रयत्न सुरू झाले. भारत जगातील सर्वोत्तम देश व्हावा, असं आम्हाला वाटतं. त्यामुळे आम्ही 130 कोटी लोकांसाठी काम करतो आहे. आमचं लक्ष कामावर आहे. कारण आम्ही कामदार आहोत, नामदार नाहीत, असं म्हणत मोदींनी काँग्रेसला अप्रत्यक्षपणे लक्ष्य केलं. जेव्हा लोकशाहीचा गोळा घोटणारे लोकशाही वाचवण्याची भाषा करतात, तेव्हा देशाच्या जनतेलाही आश्चर्य वाटतं, असा टोला मोदींनी लगावला. भ्रष्टाचाराविरोधात मी कठोर पावलं उचलली आहेच. त्यामुळे काही पक्ष नाराज झाले आहेत आणि ते नैसर्गिकच आहे. त्यांना आता पूर्वीसारखी पैशांची लूट करता येत नाही. त्यामुळे आता त्यांनी एकत्र येत महाआघाडी केली आहे. ही आघाडी माझ्याविरोधात नव्हे, तर देशाच्या जननेविरोधात आहे. अद्याप आघाडी पूर्णपणे तयारही झालेली नाही. मात्र तरीही आपल्या वाट्याला काय येणार, यासाठी त्यांची सौदेबाजी सुरू आहे, असा घणाघात मोदींनी केला. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेस