शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
2
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
3
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
4
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
5
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
6
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
7
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
8
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
9
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
10
रिपाईला एकही जागा मिळाली नाही, पण मला कॅबिनेट मिळणार - रामदास आठवले
11
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
12
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
13
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
14
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
15
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
16
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
17
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
18
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
19
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
20
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे

PM Narendra Modi : "...रॅली रद्द होण्याचं कारण रिकाम्या खुर्च्या होत्या"; काँग्रेस नेत्यानं शेअर केला Video

By ऑनलाइन लोकमत | Published: January 06, 2022 11:07 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाहनांचा ताफा बुधवारी दुपारी एका फ्लायओव्हरवर शेतकऱ्यांनी अडवला. अचानक घडलेल्या या घटनेमुळे सुरक्षा यंत्रणेत खळबळ उडाली.

पंजाबमध्ये भारत-पाकिस्तान (India Pakistan) सीमेवर असलेल्या हुसैनीवाला येथील शहीद स्मारकाला भेट देण्यासाठी जाणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या वाहनांचा ताफा बुधवारी दुपारी एका फ्लायओव्हरवर शेतकऱ्यांनी अडवला. अचानक घडलेल्या या घटनेमुळे सुरक्षा यंत्रणेत खळबळ उडाली. यानंतर मोदी पंजाबचा दौरा अर्धवट सोडून भटिंडा येथून विमानाने दिल्लीला रवाना झाले. याप्रकरणाची गंभीर दखल केंद्रीय गृहमंत्रालयाने (Home Ministry) घेतली असून सुरक्षा यंत्रणेतील गंभीर उल्लंघन व केलेल्या ढिसाळपणाबद्दल पंजाब सरकारला (Punjab Government) खुलासा मागितला आहे. दरम्यान, काँग्रसचे नेते रणदीप सिंह सुरजेवाला (Randeep Singh Surjewala) यांनी जोरदार निशाणा साधला आणि आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडीओही शेअर केला आहे.

"प्रिय नड्डाजी, रॅली रद्द होण्याचं कारण रिकाम्या खुर्च्या होत्या. जर विश्वास बसत नसेल तर पाहून घ्या. हे उगाच केलेलं वक्तव्य नाही. शेतकरी विरोधी मानसिकतेचं सत्य स्वीकार करा आणि आत्मचिंतन करा. पंजाबच्या लोकांनी रॅलीपासून लांब राहून अहंकारी सत्तेला आरसा दाखवला आहे," असं ट्वीट करत सुरजेवाला यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे.अमित शाहंनी व्यक्त केला संतापपंजाबमध्ये घडलेल्या संपूर्ण प्रकाराबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी ट्वीट करत राज्य सरकारवर संताप व्यक्त केला आहे. "पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेत झालेल्या चुकीबाबत गृहमंत्रालयानं राज्य सरकारकडे अहवाल मागितला आहे. देशाच्या पंतप्रधानांच्या दौऱ्यात  सुरक्षेबाबतची कोणतीही हयगय अजिबात सहन केली जाऊ शकत नाही. याबाबत संबंधितांना उत्तर द्यावंच लागेल आणि संपूर्ण प्रकरणाची जबाबदारी निश्चित केली जाईल", असं अमित शाह यांनी म्हटलं आहे. 

"पंजाबमध्ये आज काँग्रेस निर्मित घटनेचा ट्रेलर पाहायला मिळाला आहे आणि यातूनच या पक्षाचे विचार कळतात. काँग्रेस पक्षाकडून काय काम केलं जातं हे दिसून येतं. लोकांनी वारंवार नाकारल्यानं काँग्रेस पक्षाचं मानसिक संतुलन बिघडलं आहे. काँग्रेसच्या वरीष्ठ नेत्यांनी याबाबत देशाच्या नागरिकांची माफी मागितली पाहिजे", असंही ट्वीट त्यांनी केलं.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसPunjabपंजाब