Hathras gangrape case: हाथरस प्रकरणात कठोर कारवाई करा; पंतप्रधान मोदींच्या योगी आदित्यनाथांना सूचना
By मुकेश चव्हाण | Updated: September 30, 2020 11:29 IST2020-09-30T11:24:47+5:302020-09-30T11:29:33+5:30
हाथरस सामूहिक बलात्काराच्या घटनेतील दोषींना वाचवले जाणार नाही.

Hathras gangrape case: हाथरस प्रकरणात कठोर कारवाई करा; पंतप्रधान मोदींच्या योगी आदित्यनाथांना सूचना
हाथरस (उत्तर प्रदेश) : उत्तर प्रदेशातील हाथरस येथील १९ वर्षीय दलित मुलीवर सामूहिक बलात्कार झाला होता. दिल्लीत सफदरजंग हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना मंगळवारी पीडितेचा मृत्यू झाला. या घटनेचा देशभरातून निषेध होत असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेबाबत माहिती देताना सांगितले की, हाथरस सामूहिक बलात्काराच्या घटनेतील दोषींना वाचवले जाणार नाही. घटनेच्या चौकशीसाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे, हे पथक पुढील 7 दिवसांत अहवाल सादर करेल. वेगवान न्याय मिळावा यासाठी या खटल्याची सुनावणी फास्ट- ट्रॅक न्यायालयात करणार असल्याची माहिती योगी आदित्यनाथ यांनी दिली.
CM Yogi Adityanath forms a three-member SIT to investigate #Hathras gangrape incident, the team to submit a report within 7 days. CM also directs for trial of the case in a fast-track court. pic.twitter.com/9fVzJaNGdm
— ANI UP (@ANINewsUP) September 30, 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील हाथरस सामूहिक बलात्काराच्या घटनेचा निषेध केला. नरेंद्र मोदींनी या घटनेसंदर्भात माहिती जाणून घेतली. यानंतर दोषींवर कठोर कारवाई करण्याची सूचना नरेंद्र मोदी यांनी दिल्याचे योगी आदित्यनाथ यांनी सांगितले.
Prime Minister Narendra Modi spoke to me over #Hathras incident, he said that strictest of action be taken against the culprits: UP CM Yogi Adityanath pic.twitter.com/bqMQpCqOEO
— ANI UP (@ANINewsUP) September 30, 2020
हाथरसचे पोलीस अधीक्षक विक्रांत वीर यांनी सांगितले की, याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आणि तुरुंगात असलेल्या चारही आरोपींविरुद्ध हत्येचा गुन्हाही दाखल करण्यात येणार आहे. घटनेच्या वेळी या मुलीचा गळा दाबण्यात आला. अलिगडच्या हॉस्पिटलच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, या मुलीचे पाय पूर्णपणे निष्क्रिय झाले होते आणि हातालाही लकवा झाला होता. या मुलीने दिलेल्या जबाबानुसार, संदीप, रामू, लवकुश आणि रवी, अशी आरोपींची नावे आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.
दरम्यान, हाथरस जिल्ह्यातील चंदपा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका गावात १४ सप्टेंबर रोजी या मुलीवर सामूहिक बलात्कार झाला होता. पीडित मुलगी आपल्या आईसह शेतात गेली होती आणि अचानक गायब झाली होती. नंतर अत्यंत गंभीर जखमी अवस्थेत ती आढळून आली. आरोपीने तिचा गळा दाबण्याचा प्रयत्नही केला होता. पीडित मुलीला दुसर्या दिवशी तिला अलिगढ येथील रुग्णालयात नेण्यात आले. मात्, प्रकृती गंभीर असल्याने उत्तम वैद्यकीय सुविधांकरिता तिला दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात हलविण्यात आले. पीडित मुलीची प्रकृती चिंताजनक आणि व्हेंटिलेटरवर होती.