पंतप्रधान मोदी यांना मातृशोक; देश-विदेशांतील मान्यवरांची श्रद्धांजली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2022 05:43 IST2022-12-31T05:42:04+5:302022-12-31T05:43:24+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन यांचे १०० व्या वर्षी निधन झाले.

pm narendra modi mother heeraben modi passed away tribute of dignitaries from home and abroad | पंतप्रधान मोदी यांना मातृशोक; देश-विदेशांतील मान्यवरांची श्रद्धांजली

पंतप्रधान मोदी यांना मातृशोक; देश-विदेशांतील मान्यवरांची श्रद्धांजली

अहमदाबाद: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन (वय १००) यांचे शुक्रवारी पहाटे रुग्णालयात निधन झाले. श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्यांना बुधवारी अहमदाबादमधील ‘यू. एन. मेहता इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिओलॉजी अँड रिसर्च सेंटर’मध्ये दाखल केले होते. पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या पार्थिवास भडाग्नी दिला. 

हिराबेन यांच्या पश्चात पाच मुलगे - पंतप्रधान मोदी आणि त्यांचे भाऊ सोमाभाई, अमृतभाई, प्रल्हादभाई आणि पंकजभाई, मुलगी वासंतीबेन असा परिवार आहे. पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या भावांनी खांदा देत पार्थिव अंत्यसंस्कारासाठी नेले. 

करुणामय जीवनाचे स्मरण

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हिराबेन यांच्या करुणामय जीवनाचे स्मरण केले. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, प्रियांका गांधी, महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदींनी शोक व्यक्त केला.  पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ, जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांनीही हिराबेन यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: pm narendra modi mother heeraben modi passed away tribute of dignitaries from home and abroad