शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
3
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
4
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
5
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
6
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
7
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
8
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
9
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
10
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
11
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
12
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
13
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
14
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
15
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
16
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
17
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
18
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
19
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
20
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...

वाजपेयी महाभेसळ सरकार चालवत होते का?; काँग्रेसचा मोदींवर पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2019 09:55 IST

विरोधकांच्या एकीवर टीका करणाऱ्या मोदींवर काँग्रेसचा हल्लाबोल

नवी दिल्ली: विरोधकांच्या एकीला महाभेसळ म्हणणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनाकाँग्रेसनं प्रत्युत्तर दिलं आहे. विरोधक एकत्र आल्यावर मोदी त्यांना महाभेसळ म्हणतात. मग महाआघाडीचं नेतृत्त्व करुन तीन वेळा सरकार स्थापन करणाऱ्या माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी महाभेसळीचं नेतृत्त्व केलं होतं, असं म्हणायचं का, असा सवाल माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस नेते मनीष तिवारींनी उपस्थित केला. शुक्रवारी छत्तीसगडच्या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदींनी जनसभेला संबोधित करताना विरोधकांच्या वाढत्या जवळिकीवरही शरसंधान साधलं. लोकांनी महाभेसळीपासून सावध राहावं, असं आवाहन त्यांनी केलं. यावरुन काँग्रेसनं मोदींवर जोरदार पलटवार केला. 40-42 पक्षांचा समावेश असलेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं नेतृत्त्व करणारे मोदीच महाभेसळीचे म्होरके आहेत, अशा शब्दांमध्ये काँग्रेस नेते मनीष तिवारींनी पंतप्रधानांना लक्ष्य केलं.दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या आघाडी सरकाराचा संदर्भ देत काँग्रेसनं मोदींवर तोफ डागली. '1996, 1998 आणि 1999 मध्ये महाआघाडीचं सरकार चालवणारे अटल बिहारी वाजपेयी यांनी महाभेसळीचं नेतृत्त्व केलं होतं का?', असा प्रश्न तिवारींनी उपस्थित केला. 'आज वाजपेयींचा अंतरात्मा रडत असेल. त्यांचं सरकार महाभेसळीचं सरकार होतं का, असा प्रश्न आम्ही विचारु इच्छितो. या प्रश्नाचं उत्तर मोदींनी द्यावं,' असं तिवारी म्हणाले. मोदींवर हल्लाबोल करताना मनीष तिवारींनी इतिहासाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. 'या देशात आघाडी सरकारची प्रक्रिया कोणी सुरू केली? व्ही. पी. सिंग यांना कोणी पाठिंबा दिला? 1996 मध्ये 13 दिवसांचं सरकार कोणाच्या समर्थनामुळे स्थापन झालं? आघाडी महाभेसळ आहे, असं मोदी म्हणतात. मग एनडीएमध्ये इतर पक्ष नाहीत का? मोदी एनडीएचं नेतृत्व करतात. एनडीएमध्ये 40-42 पक्ष आहेत. त्यामुळे मोदी महाभेसळीचं म्होरके ठरतात,' अशा शब्दांमध्ये तिवारींनी मोदींचा समाचार घेतला.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीAtal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयीcongressकाँग्रेसBJPभाजपा