शहरं
Join us  
Trending Stories
1
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
2
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
4
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
5
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
7
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
8
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
9
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
10
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
11
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
12
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
13
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
14
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
15
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
16
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
17
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
18
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
19
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
20
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज

Narendra Modi: 1 कोटी कुटुंबांसाठी खूशखबर! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी उज्ज्वला 2.0 लाँच करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2021 8:09 PM

Pradhan Mantri Ujjwala Yojana-PMUY: आर्थिक वर्ष 21-22 च्या बजेटमध्ये पीएमयूवाय स्कीमनुसार एक कोटी अतिरिक्त एलपीजी कनेक्शन देण्याची तरतूद करण्यात आली होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) मंगळवारी दुपारी 12.30 वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे उत्तर प्रदेशमध्ये महोबा येथे एलपीजी कनेक्शन (LPG connection) देऊन उज्ज्वला 2.0 (पंतप्रधान उज्ज्वला योजना) शुभारंभ करणार आहेत. कार्यक्रमावेळी पंतप्रधान मोदी उज्ज्वला योजनेच्या (Ujjwala 2.0) लाभार्थ्यांसोबत चर्चा करणार आहेत.  (The beneficiaries of Ujjwala 2.0 will not only get deposit-free LPG connection but also free of cost first refill and hotplate.)

2016 मध्ये उज्ज्वला 1.0 योजना लाँच करण्यात आली होती. बीपीएल परिवारात ५ कोटी महिलांना एलपीजी कनेक्शन उपलब्ध करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. यानंतर योजनेच्या विस्तारात 2018 मध्ये सात आणि श्रेणींमध्ये (एससी/एसटी सारख्या) 8 कोटींचे वाढीव लक्ष्य ठेवण्यात आले होते. हे टार्गेट सात महिन्यांआधीच ऑगस्ट 2019 मध्ये पूर्ण करण्यात आले होते. 

आर्थिक वर्ष 21-22 च्या बजेटमध्ये पीएमयूवाय स्कीमनुसार एक कोटी अतिरिक्त एलपीजी कनेक्शन देण्याची तरतूद करण्यात आली होती. एक कोटी अतिरिक्त पीएमयूवाय कनेक्शन (उज्ज्वला 2.0) द्वारे कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबाला एलपीजी कनेक्शन देणे हा उद्देश आहे. ज्यांना पहिल्या योजनेत देता आले नव्हते. 

उज्ज्वला 2.0 लाभार्थ्यांना डिपॉझिट फ्री एलपीजी कनेक्शन सोबत पहिली रिफिल आणि हॉटप्लेट मोफत देण्यात येणार आहे. सोबतच कमीतकमी कागदपत्र लागणार आहेत. उज्ज्वला 2.0 च्या लोकांना रेशन कार्ड किंवा अॅड्रेस प्रूफ जमा करावा लागणार आहे. ही योजना लाँच करताना केंद्रीय पेट्रोलियम मंत्री आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री देखील हजर राहतील. (PM Narendra Modi to launch Ujjwala Yojana 2.0 on August 10)

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीCylinderगॅस सिलेंडर