शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या 'आयुष्मान भारत डिजिटल मोहिमे'चे करणार उद्घाटन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2021 21:51 IST

ayushman bharat digital mission : व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणारा हा कार्यक्रम सकाळी 11 वाजता सुरू होईल. उद्घाटनानंतर पंतप्रधान मोदी भाषणही करतील.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी आयुष्मान भारत डिजिटल मोहिमेचे उद्घाटन करणार आहेत. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणारा हा कार्यक्रम सकाळी 11 वाजता सुरू होईल. उद्घाटनानंतर पंतप्रधान मोदी भाषणही करतील. सध्या ही डिजिटल मोहीम सहा केंद्रशासित प्रदेशांमध्ये सुरुवातीच्या टप्प्यात आहे. (pm narendra modi to launch ayushman bharat digital mission on september 27 here is all you need to know)

केंद्र सरकारच्या मते, आयुष्मान भारत डिजिटल अभियान एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म तयार करेल, जे डिजिटल हेल्थ इको सिस्टम अंतर्गत इतर आरोग्य क्षेत्राशी संबंधीत पोर्टल्सची इंटरऑपरेबिलिटी सक्षम करेल. राष्ट्रीय स्तरावर, राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाच्या (एनएचए) आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त ही मोहीम सुरू केली जात आहे. या मोहिमेच्या उद्घाटनाला केंद्रीय मंत्रीही उपस्थित राहणार आहेत.

नागरिकांना मिळेल हेल्थ आयडीया अंतर्गत, नागरिकांना आरोग्य ओळखपत्र (हेल्थ आयडी) दिले जाईल, जे त्यांच्या आरोग्य खात्यासाठी देखील काम करेल. या आयडीद्वारे, एखादी व्यक्ती मोबाईल अॅपद्वारे त्याच्या आरोग्याच्या नोंदी पाहू शकेल. डॉक्टर/रुग्णालये आणि आरोग्य सेवा देणाऱ्यांसाठी व्यवसाय सुलभ होईल. मोहिमेचा भाग म्हणून तयार केलेला आयुष्मान भारत डिजिटल मिशन सँडबॉक्स तंत्रज्ञान आणि उत्पादन चाचणीसाठी एक चौकट म्हणून काम करेल.

महत्वाची भूमिका निभावेल सँडबॉक्सयाव्यतिरिक्त हा सँडबॉक्स 'खाजगी संस्थांना' देखील मदत करेल, जे राष्ट्रीय डिजिटल आरोग्य परिसंस्थेचा भाग बनून आरोग्य माहिती प्रदाते किंवा आरोग्य माहिती वापरकर्ते किंवा या मोहिमेअंतर्गत तयार केलेल्या ब्लॉकसोबत कार्यक्षमतेने स्वत: ला जोडू इच्छितात. केंद्र सरकारच्या मते, या डिजिटल मोहिमेद्वारे, देशातील लोकांचा आरोग्यविषयक सेवांपर्यंतचा प्रवेश फक्त एका क्लिकवर असेल. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीHealthआरोग्यayushman bharatआयुष्मान भारत