पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या 'आयुष्मान भारत डिजिटल मोहिमे'चे करणार उद्घाटन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2021 09:50 PM2021-09-26T21:50:29+5:302021-09-26T21:51:54+5:30

ayushman bharat digital mission : व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणारा हा कार्यक्रम सकाळी 11 वाजता सुरू होईल. उद्घाटनानंतर पंतप्रधान मोदी भाषणही करतील.

pm narendra modi to launch ayushman bharat digital mission on september 27 here is all you need to know  | पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या 'आयुष्मान भारत डिजिटल मोहिमे'चे करणार उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या 'आयुष्मान भारत डिजिटल मोहिमे'चे करणार उद्घाटन

Next

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी आयुष्मान भारत डिजिटल मोहिमेचे उद्घाटन करणार आहेत. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणारा हा कार्यक्रम सकाळी 11 वाजता सुरू होईल. उद्घाटनानंतर पंतप्रधान मोदी भाषणही करतील. सध्या ही डिजिटल मोहीम सहा केंद्रशासित प्रदेशांमध्ये सुरुवातीच्या टप्प्यात आहे. (pm narendra modi to launch ayushman bharat digital mission on september 27 here is all you need to know)

केंद्र सरकारच्या मते, आयुष्मान भारत डिजिटल अभियान एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म तयार करेल, जे डिजिटल हेल्थ इको सिस्टम अंतर्गत इतर आरोग्य क्षेत्राशी संबंधीत पोर्टल्सची इंटरऑपरेबिलिटी सक्षम करेल. राष्ट्रीय स्तरावर, राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाच्या (एनएचए) आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त ही मोहीम सुरू केली जात आहे. या मोहिमेच्या उद्घाटनाला केंद्रीय मंत्रीही उपस्थित राहणार आहेत.


नागरिकांना मिळेल हेल्थ आयडी
या अंतर्गत, नागरिकांना आरोग्य ओळखपत्र (हेल्थ आयडी) दिले जाईल, जे त्यांच्या आरोग्य खात्यासाठी देखील काम करेल. या आयडीद्वारे, एखादी व्यक्ती मोबाईल अॅपद्वारे त्याच्या आरोग्याच्या नोंदी पाहू शकेल. डॉक्टर/रुग्णालये आणि आरोग्य सेवा देणाऱ्यांसाठी व्यवसाय सुलभ होईल. मोहिमेचा भाग म्हणून तयार केलेला आयुष्मान भारत डिजिटल मिशन सँडबॉक्स तंत्रज्ञान आणि उत्पादन चाचणीसाठी एक चौकट म्हणून काम करेल.

महत्वाची भूमिका निभावेल सँडबॉक्स
याव्यतिरिक्त हा सँडबॉक्स 'खाजगी संस्थांना' देखील मदत करेल, जे राष्ट्रीय डिजिटल आरोग्य परिसंस्थेचा भाग बनून आरोग्य माहिती प्रदाते किंवा आरोग्य माहिती वापरकर्ते किंवा या मोहिमेअंतर्गत तयार केलेल्या ब्लॉकसोबत कार्यक्षमतेने स्वत: ला जोडू इच्छितात. केंद्र सरकारच्या मते, या डिजिटल मोहिमेद्वारे, देशातील लोकांचा आरोग्यविषयक सेवांपर्यंतचा प्रवेश फक्त एका क्लिकवर असेल.
 

Web Title: pm narendra modi to launch ayushman bharat digital mission on september 27 here is all you need to know 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.