शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत ३०.८५ टक्के मतदान; 'या' मतदारसंघात मिळाला सर्वाधिक प्रतिसाद!
2
'अडवाणी, मुरली मनोहर जोशींप्रमाणे नरेंद्र मोदींनाही ७५ वर्षानंतर राजकारणातून निवृत्त करणार का? काँग्रेसचा सवाल
3
'4 जूनपूर्वी खरेदी करा, दमदार वाढ होणार...', शेअर बाजाराबाबत अमित शाहंची भविष्यवाणी
4
शाहीन आफ्रिदी आणि अफगाणिस्तानच्या चाहत्यामध्ये बाचाबाची, नेमकं काय घडलं? Video
5
Arvind Kejriwal : "कधी कधी अपमानित करायचे..."; अरविंद केजरीवालांनी सांगितली जेलमधील आपबीती
6
बारामतीतील EVM स्ट्राँगरुमचे CCTV अचानक बंद झाल्याचा सुळेंचा आरोप; निवडणूक अधिकारी म्हणाले...
7
मराठी मालिकेच्या सेटवर बिबट्याची एन्ट्री, ४०० भाग पूर्ण झाल्यानिमित्त होतं सेलिब्रेशन
8
'पाकिस्तानने बांगड्या भरल्या नसतील तर आम्ही त्यांना बांगड्या भरण्यास भाग पाडू', नरेंद्र मोदींचा टोला   
9
Virat Kohli-अनुष्का शर्माची २.५ कोटींच्या गुंतवणूकीचे झाले ९ कोटी; आता कंपनीचा येणार IPO, गुंतवणूक करणार का?
10
धावत्या BULLET ला लागली आग; पेट्रोल टाकीचा स्फोट होऊन एकाचा मृत्यू तर 9 गंभीर जखमी
11
पैसे काढण्याशिवायही आहे तुमच्या ATM कार्डाचा उपयोग, त्यावर मिळणाऱ्या विम्याची माहिती आहे का? पाहा
12
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates :राज्यात निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी ३०.८५ टक्के मतदान झाले
13
Lok Sabha Election दरम्यान शेअर बाजारात का दिसतो चढ-उतार? आकडेवारीवरुन मिळेल उत्तर
14
१८ व्या वर्षी दृष्टी गेली, आईच्या मदतीनं पेपर लिहिलं; संघर्षातून युवक बनला IAS
15
Rahul Gandhi : "सरकार स्थापन झालं तर खटा-खट, खटा-खट पैसे..."; राहुल गांधींनी स्पष्टच सांगितलं
16
शरद पवारांकडून सुपारी घेऊन संजय राऊतांनी उबाठा संपवली; मनसेचा जोरदार पलटवार
17
रोहित वयाच्या ५० व्या वर्षापर्यंत क्रिकेट खेळू शकतो; युवीच्या वडिलांचा दावा, BCCI ला दिला खास सल्ला
18
भाजपा उमेदवार माधवी लता आणखी एका वादात; मतदान केंद्रावर महिलांच्या चेहऱ्यावरून काढला बुरखा;ओळखपत्र तपासले
19
Exclusive:"नरेंद्र मोदीच निवडून येतील असं वातावरण.."; श्रेयस तळपदेने स्पष्टच सांगितलं
20
'बजरंगी भाईजान'च्या मुन्नीने केलं आलमजेबला कॉपी; 'एक बार देख लिजिए'वर दिले जबरदस्त एक्स्प्रेशन्स

माझे निर्णय कुणाला घाबरवण्यासाठी, दडपण्यासाठी नाहीत..., PM मोदींनी सांगितला फ्यूचर प्लॅन! इलेक्टोरल बॉन्डवरही बोलले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2024 7:06 PM

PM Narendra Modi Interview 2024 : पीएम मोदी म्हणाले, माझ्याकडे 25 वर्षांचे व्हिजन आहे. मी गुजरातमध्ये असतानाच यासंदर्भात विचार करत होतो. 2024 च्या निवडणुका ही देशापुढील एक संधी आहे. एक मॉडेल काँग्रेस सरकारचे आणि एक मॉडेल भाजप सरकारचे. त्यांचा 5-6 दशकांचा काळ आणि माझा एक दशकाचा. कोणत्याही क्षेत्रात तुलना करा, तुम्हाला कळेल.

देशापुढे एक संधी आहे, एक काँग्रेस सरकारचे मॉडेल, तर एक भाजप सरकारचे मॉडेल. त्यांचा 5-6 दशकांचा कार्यकाळ आणि माझा केवळ 10 वर्षांचा कार्यकाळ. माझ्याकडे मोठ्या योजना आहेत. माझे निर्णय कुणाला घाबरवण्यासाठी किंवा दडपण्यासाठी नसून ते देशाच्या सर्वांगीण विकासासाठी आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. ते एएनआयला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. यावेळी, त्यांनी इलेक्टोरल बाँडपासून ते सीएएपर्यंत अनेक मुद्द्यावर भाष्य केले. तसेच विकसित भारत @2047 च्या व्हिजनवरही चर्चा झाली.

इलेक्टोरल बॉन्डवर काय म्हणाले मोदी? - राहुल गांधी यांनी इलेक्टोरल बाँड्सच्या मुद्द्यावरून केलेल्या हल्ल्याला पंतप्रधान मोदींनी चोख प्रत्युत्तर दिले. इलेक्टोरल बॉण्ड्स असतील तर तुम्हाला पैशांचा मागमूस मिळेल. कोणत्या कंपनीने ते दिले, कसे दिले, कुठे दिले. म्हणूनच तर मी म्हणतोय की, प्रत्येकाला पश्चात्ताप होईल. प्रामाणिकपणे विचार केला तर सर्वांनाच पश्चाताप होईल.

'वन नेशन, वन इलेक्शन' -'वन नेशन, वन इलेक्शन'वर बोलताना पीएम मोदी म्हणाले, ही आमची वचनबद्धता आहे. अनेकांनी आपल्या सूचना समितीला दिल्या आहेत. अनेक सकारात्मक आणि नाविन्यपूर्ण सूचना आल्या आहेत. या अहवालाची अंमलबजावणी करू शकलो तर देशाला मोठा फायदा होईल.

व्हिजन 2047 वर काय म्हणाले मोदी? -पीएम मोदी म्हणाले, माझ्याकडे 25 वर्षांचे व्हिजन आहे. मी गुजरातमध्ये असतानाच यासंदर्भात विचार करत होतो. 2024 च्या निवडणुका ही देशापुढील एक संधी आहे. एक मॉडेल काँग्रेस सरकारचे आणि एक मॉडेल भाजप सरकारचे. त्यांचा 5-6 दशकांचा काळ आणि माझा एक दशकाचा. कोणत्याही क्षेत्रात तुलना करा, तुम्हाला कळेल.

2047 मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळून 100 वर्षे पूर्ण होतील. अशा वेळी देशात एक प्रेरणा जगृत होणे हेच प्रेरणादायी आहे. 2024 हे एक महापर्व असून उत्सव म्हणून साजरे करायला हवे. माझे 2047चे जे व्हिजन आहे, ते काही मोदींचा वारसा नाही. त्यात 15-20 लाख लोकांच्या विचाराचा समावेश आहे. एक प्रकारे त्यावर देशाची मालकी आहे. मी केवळ ते कागदपत्राच्या स्वरूपात तयार केले आहे, असेही मोदी म्हणाले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाinterviewमुलाखतRahul Gandhiराहुल गांधीElectionनिवडणूकlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४