मोदी सरकार UPA सरकारच्या आर्थिक गैरव्यवस्थापनावर 'श्वेतपत्रिका' आणणार! जाणून घ्या संसदेत केव्हा सादर होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2024 07:19 PM2024-02-06T19:19:38+5:302024-02-06T19:20:32+5:30

Parliament Budget Session 2024: ही श्वेतपत्रिका शुक्रवारी अर्थात 9 फेब्रुवारीला अथवा शनिवारी  म्हणजेच 10 फेब्रुवारीला सभागृहात सादर केली जाऊ शकते.

pm Narendra Modi government will released white paper on the economic mismanagement of the upa regime | मोदी सरकार UPA सरकारच्या आर्थिक गैरव्यवस्थापनावर 'श्वेतपत्रिका' आणणार! जाणून घ्या संसदेत केव्हा सादर होणार

मोदी सरकार UPA सरकारच्या आर्थिक गैरव्यवस्थापनावर 'श्वेतपत्रिका' आणणार! जाणून घ्या संसदेत केव्हा सादर होणार

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारच्या (2004-2014) 10 वर्षांच्या कार्यकाळातील आर्थिक गैरव्यवस्थापनासंदर्भात संसदेत श्वेतपत्रिका आणणार आहे. ही श्वेतपत्रिका शुक्रवारी अर्थात 9 फेब्रुवारीला अथवा शनिवारी  म्हणजेच 10 फेब्रुवारीला सभागृहात सादर केली जाऊ शकते.

या श्वेतपत्रिकेत आर्थिक गैरव्यवस्थापनाशिवाय यूपीए सरकारच्या कार्यकाळात उचलल्या जाऊ शकणाऱ्या सकारात्मक पावलांच्या परिणामांसंदर्भातही चर्चा केली जाईल. एवढेच नाही, तर या श्वेतपत्रिकेच्या माध्यमातून भारताची आर्थिक दुर्दशा आणि अर्थव्यवस्थेवर पडलेला नकारात्मक प्रभवही सविस्तरपणे समोर समोर ठेवला जाईल.

काय म्हणाल्या होत्या निर्मला सीतारामन? -
तत्पूर्वी, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वीचा तात्पुरता अर्थसंकल्प नुकताच सादर केला.  यावेळी त्यांनी मोदी सरकारच्या गेल्या 10 वर्षांतील कामाचा लेखाजोखा मांडला आणि विविध बाबतीत त्याची तुलना यूपीए सरकारच्या 10 वर्षांच्या कार्यकाळाशी केली. यूपीए सरकारच्या कार्यकाळात अर्थव्यवस्थेचे कसे गैरव्यवस्थापन झाले, यावर श्वेतपत्रिका मांडणार असल्याचेही निर्मला सीतारामन यांनी तेव्हा जाहीर केले होते.

पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या नेतृत्वातील एनडीए सरकार 2014मध्ये सत्तेवर आले. त्यापूर्वीच्या 10 वर्षांच्या काळात काय झाले आणि त्यातून काय धडे घ्यायला हवे, हे सांगण्यासाठी श्वेतपत्रिका काढणार असल्याचे अर्थमंत्री सीतारामन म्हणाल्या होत्या. एवढेच नाही तर, माेदी सरकार स्थापन झाले त्यावेळी अर्थव्यवस्था टप्प्याटप्प्याने सुधारणे आणि शासन व्यवस्थेची घडी नीट बसविण्याची माेठी जबाबदारी सरकारवर हाेती. लाेकांना आशा देणे, गुंतवणूक आकर्षित करणे आणि अतिशय आवश्यक असलेल्या सुधारणांसाठी समर्थन उभे करणे, ही त्यावेळी काळाची गरज हाेती. ‘देश प्रथम’ या तत्त्वावर विश्वास ठेवून सरकारने हे कार्य यशस्वीपणे पार पाडले. सरकारसमाेरील संकटांवर मात करून, सर्वांगीण विकास साधण्यासाठी अर्थव्यवस्थेला सातत्यशील विकासाच्या मार्गावर आणण्यात आले आहे, असे सीतारामन यांनी म्हटले होते.

महागाईच्या मुद्द्यावरून काँग्रेसवर निशाणा -
सोमावारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर धन्यवाद प्रस्तावावर झालेल्या चर्चेला उत्तर देताना काँग्रेसवर निशाणा साधला होता. यावेळी त्यांनी महागाईच्या मुद्द्यावरून काँग्रेसवर निशाणा साधला होता. ते म्हणाले, ''युक्रेन आणि गाझामध्ये युद्ध सुरू असूनही देशातील महागाई नियंत्रणात आहे. देशातील महागाईवर दोन गाणी सुपर हिट झाले. एक ‘महंगाई मार गई’ आणि दुसरे ‘महंगाई डायन खाए जात है’. हे दोन्ही गाणी काँग्रेस सरकारच्या कार्यकाळा आली आहेत.’’

महत्वाचे म्हणजे, या वेळचे संसदेतील अर्थसंकल्पिय अधिवेशन अत्यंत महत्वाचे मानले जात आहे. कारण हे या वर्षात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वीचे अखेरचे अधिवेश  आहे. 
 

Web Title: pm Narendra Modi government will released white paper on the economic mismanagement of the upa regime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.