शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 
2
बच्चू कडू यांच्यावर हत्येचा कट रचल्याप्रकरणी गुन्हा; आमदाराच्या चुलत भावालाच संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप
3
राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
4
इराणनं आखला बदल्याचा 'मास्टर प्लॅन'! आखाती देशांतील ८ मोठे पूल 'हिट लिस्ट'वर; बघा संपूर्ण लिस्ट
5
आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
6
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
7
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
8
कोणी केली डोनाल्ड ट्रम्प यांची येशू ख्रिस्तांशी तुलना? 'त्या' वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले...
9
वॉरेन बफे यांचे सूत्र भारतात हिट! १९०० अंकांच्या घसरणीनंतर सेन्सेक्स सावरला, कसे ओळखायचे 'व्हॅल्यू बाइंग'?
10
Crude Oil: भारताऐवजी चीनकडे वळला इराणचा कच्च्या तेलाचा टँकर; गुजरातला येणाऱ्या जहाजाचा ऐनवेळी मार्ग बदलला
11
डॉक्टरचा हलगर्जीपणा नडला! फोनवर नर्सला दिल्या डिलिव्हरीच्या सूचना; आईसह बाळाचा मृत्यू
12
पश्चिम बंगालमधील सर्वात 'लेटेस्ट' निवडणूक सर्वेक्षणात भाजपची मोठी मुसंडी; TMC ला झटका! जनतेचा 'मूड' बदलला?
13
“बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत महाविकास आघाडीचे प्रमुख नेते निर्णय घेतील”: संजय राऊत
14
तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... 
15
INS तारागिरी! समुद्रात येतंय वादळ, भारताची नौदल ताकद वाढणार; किती विध्वंसक आहे युद्धनौका?
16
अमेरिकेने इराणमध्ये मर्यादा ओलांडल्या! जिनिव्हा कन्व्हेन्शनचे नियम पायदळी तुडवले, काय केले..?
17
"आमच्या घरी नोटांची बंडलं यायची अन् बाबा..." ढोंगी अशोक खरातच्या मुलानेच उघडली पित्याची कुंडली
18
Life Lesson: जपानी लोकांसारखं यशस्वी आणि दीर्घायुषी व्हायचंय? 'या' सात नियमांचे आजपासून पालन करा
19
भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज
20
इस्रायलचा पुन्हा एकदा विश्वासघात, नेतन्याहू संतापले; भारताच्या २ मित्र देशांमध्ये तणाव वाढला
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान मोदींनी श्रीलंकेच्या राष्ट्रपतींना लावला फोन; पश्चिम आशियातील तणावावर चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 23:05 IST

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी मध्य-पूर्वेतील बदलत्या परिस्थितीवर चर्चा केली.

नवी दिल्ली - पश्चिम आशियात सुरू असलेल्या संकटात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुरा कुमारा दिसानायके यांच्याशी फोनवर चर्चा केली. दोन्ही नेत्यांमध्ये पश्चिम आशियातील जागतिक ऊर्जा सुरक्षेवर चर्चा झाली. जवळचे आणि विश्वासू भागीदार म्हणून सामायिक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी एकत्र काम करण्याची गरज असल्याचं दोघांनी म्हटलं. 

पंतप्रधान मोदींनी दिली सविस्तर माहिती

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं की, मी श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुरा कुमार दिसानायके यांच्याशी संवाद साधला आणि पश्चिम आशियातील बदलत्या परिस्थितीवर चर्चा केली.  ज्यात जागतिक ऊर्जा सुरक्षेवर परिणाम करणाऱ्या आव्हानांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले. भारत-श्रीलंका ऊर्जा सहकार्य मजबूत करण्याच्या आणि प्रादेशिक सुरक्षा वाढवण्याच्या उद्देशाने असलेल्या प्रमुख उपक्रमांवरील प्रगतीचा आम्ही आढावा घेतला. जवळचे आणि विश्वासू भागीदार म्हणून सामायिक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी एकत्र काम करण्याच्या आमच्या वचनबद्धतेचा आम्ही पुनरुच्चार केला असं त्यांनी सांगितले.

संघर्ष रोखण्यासाठी ट्रम्प यांचा पुढाकार

यापूर्वी अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी मध्य-पूर्वेतील बदलत्या परिस्थितीवर चर्चा केली. यावेळी दोन्ही नेत्यांनी होर्मुझची सामुद्रधुनी खुली ठेवण्याच्या महत्त्वाच्या मुद्द्यावर भर दिला आणि संपर्कात राहण्याचे वचन दिले. मध्य पूर्वेतील संघर्ष कमी करण्याच्या दिशेने डोनाल्ड ट्रम्प पाऊल टाकत आहेत. अमेरिका आणि इराण यांच्यात २८ फेब्रुवारीला चर्चा फिस्कटली होती त्यानंतर अमेरिका इस्रायलने मिळून इराणवर सैन्य कारवाई केली. या संघर्षात आतापर्यंत १५०० लोकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिका इस्रायलच्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इराणने इस्रायलसह आखाती देशांनाही टार्गेट केले. त्यामुळे हे युद्ध मध्य पूर्वेत भडकले. त्यात स्ट्रेट होर्मुझमधील जल वाहतूक विस्कळीत झाल्याने जागतिक ऊर्जा संकट उद्भवले. त्यामुळे ट्रम्प यांच्यावरील दबाव वाढला आहे. त्यामुळे इराणसोबत नव्याने चर्चेसाठी अमेरिका प्रयत्नशील असून चर्चेतून या युद्धावर तोडगा काढण्यासाठी ट्रम्प हालचाली करत आहेत. त्यामुळे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत ट्रम्प यांनी साधलेला संवाद याच दिशेने आणखी एक पाऊल आहे का हे पाहणे गरजेचे आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Modi phones Sri Lankan President, discusses West Asia tensions.

Web Summary : PM Modi discussed West Asia tensions with Sri Lanka's President. They addressed global energy security and committed to collaborative solutions. Trump seeks to de-escalate Middle East conflict, engaging Modi on regional stability.
टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीSri Lankaश्रीलंकाDonald Trumpडोनाल्ड ट्रम्प