Modi Cabinet Reshuffle: शिंदे, सुशील मोदींसह 17 ते 22 नवे चेहरे दिसू शकतात मोदी मंत्रिमंडळात, महाराष्ट्रातून 3 नावं चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2021 15:32 IST2021-07-05T15:29:27+5:302021-07-05T15:32:13+5:30
ज्या राज्यांत पुढील वर्षी विधानसभेच्या निवडणुका आहेत, त्या राज्यांतील सोशल इंजिनिअरिंग लक्षात घेत मंत्रीमंडळाचा विस्तार केला जाऊ शकतो.

Modi Cabinet Reshuffle: शिंदे, सुशील मोदींसह 17 ते 22 नवे चेहरे दिसू शकतात मोदी मंत्रिमंडळात, महाराष्ट्रातून 3 नावं चर्चेत
नवी दिल्ली - मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार याच आठवड्यात होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान मोदी 7 जुलैला मंत्रिमंडळाचा विस्तार करू शकतात, असे समजते. मोदींच्या या नव्या मंत्रिमंडळात 17 ते 22 मंत्री शपथ घेऊ शकतात. ज्या राज्यांत पुढील वर्षी विधानसभेच्या निवडणुका आहेत, त्या राज्यांतील सोशल इंजिनिअरिंग लक्षात घेऊन मंत्रीमंडळाचा विस्तार केला जाऊ शकतो. याशिवाय राज्यस्थरावरील पक्षांच्या नेत्यांनाही मंत्रिमंडळात स्थान देऊन एनडीए आणखी मजबूत करण्याची तयारी असेल. जाणून घ्या कोणत्या राज्यातून किती मंत्री मोदींच्या मंत्रिमंडळात सामील होऊ शकतात.
उत्तर प्रदेश
- तीन ते चार मंत्र्यांचा समावेश करण्यात येईल.
- अपना दलच्या अनुप्रिया पटेल
बिहार
- दोन ते तीन मंत्री सामिल होतील.
- भाजप - सुशील मोदी
- जेडीयूचे RCP सिंह
- आणि एलजेपीचे पशुपती पारस
मध्य प्रदेश
- एक ते दोन मंत्री सामील होतील
- ज्योतिरादित्य शिंदे
- राकेश सिंह
महाराष्ट्र
- एक ते दोन मंत्री सामील होतील
- नारायण राणे
- हिना गावित
- रणजीत नाईक निंबाळकर
राजस्थान
- एका मंत्र्याचा होऊ शकतो समावेश
जम्मू-काश्मीर
- एक मंत्रीपद मिळू शकते.
लडाख
- एक मंत्रीपद मिळू शकते
आसाम
- एक ते दोन मंत्री सामील होई शकतात.
- सोनोवाल
पश्चिम बंगाल
- शांतनू ठाकूर
- निशीथ प्रामाणिक
ओडिशा
एक मंत्रीपद मिळू शकते.
याशिवाय मोदी मंत्रीमंडळात जेडीयू, एलजेपी आणि वायएसआर काँग्रेसचे मंत्रीही सामील होऊ शकतात.
मंत्रिमंडळात अतिरिक्त प्रभार असलेले हे 9 मंत्री सोडू शकतात अतिरिक्त मंत्रालय -
- प्रकाश जावडेकर
- पीयूष गोयल
- धर्मेंद्र प्रधान
- नितिन गडकरी
- डॉ हर्षवर्धन
- नरेंद्र सिंह तोमर
- रविशंकर प्रसाद
- स्मृती ईरानी
- हरदीप सिंह पुरी.
केंद्रीय मंत्रिमंडळात 81 सदस्य असू शकतात. सध्या 53 मंत्री आहे. म्हणजेच आणखी 28 मंत्र्याचा समावश होऊ शकतो.