पंतप्रधान मोदींकडून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2018 10:35 AM2018-02-19T10:35:52+5:302018-02-19T10:46:23+5:30

शिवाजी महाराजांसारखे शूर आणि महान व्यक्तीमत्व आपल्या भूमीत जन्मले याचा भारताला अभिमान आहे.

PM Narendra Modi bow to Shivaji Maharaj on his Jayanti | पंतप्रधान मोदींकडून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन

पंतप्रधान मोदींकडून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन

Next

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी शिवजयंतीनिमित्त आपल्या ट्विटर अकाऊंटवरील संदेशाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना वाहिली. मोदींनी एक व्हिडीओ पोस्ट करत महाराजांच्या जयंतीनिमित्त एक महत्त्वाचा संदेशही दिला आहे. शिवाजी महाराजांसारखे शूर आणि महान व्यक्तीमत्व आपल्या भूमीत जन्मले याचा भारताला अभिमान आहे. शिवाजी महाराज पुन्हा होणे नाही, असे मोदींनी या व्हिडीओत म्हटले आहे. 

तसेच या व्हिडीओच्या माध्यमातून मोदींनी देशातील जनतेला एक आवाहनही केले आहे. त्यासाठी मोदींच्या पूर्वीच्या भाषणांचा संदर्भ वापरण्यात आला आहे. दरदिवशी प्रत्येक भारतीयाने किमान एका व्यक्तीची सेवा करावी, तरच या सेवेच्या माध्यमातून आपण महाराजांनी पाहिलेली स्वप्न पूर्ण करु शकतो, असं ते एका भाषणात म्हणाले होते. याशिवाय, मोदींनी त्यांच्या भाषणादरम्यान  ‘जय भवानी जय शिवाजी’ केलेल्या जयघोषाचाही व्हिडीओमध्ये कल्पकतेने वापर करण्यात आला आहे. आज शिवजयंतीनिमित्त राज्यभरात शासकीय कार्यक्रमांसह अनेक संस्थांनी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

दरम्यान, कोल्हापूरमध्ये एका दुर्देवी घटनेमुळे शिवप्रेमींच्या उत्साहावर विरजण पडले आहे.  शिवजयंतीनिमित्त सांगलीतल्या वालचंद महाविद्यालयातील विद्यार्थी पन्हाळ्याकडून सांगलीकडे शिवज्योत घेऊन चालले होते. त्यावेळी त्यांच्या ट्रकला झालेल्या अपघातात पाच जणांचा मृत्यू  झाला. 



 

Web Title: PM Narendra Modi bow to Shivaji Maharaj on his Jayanti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.