पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आणखी एक मोठा सन्मान, ग्लोबल एनर्जी अँड एनव्हायरमेंट लीडरशीप पुरस्कार जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2021 10:39 PM2021-03-04T22:39:16+5:302021-03-04T22:40:41+5:30

PM Narendra Modi Global Energy Award: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना शुक्रवारी आंतरराष्ट्रीय ऊर्जा परिषदेदरम्यान 'ग्लोबल एनर्जी अँड एनव्हायरमेंट लीडरशीप' पुरस्कारानं गौरविण्यात येणार आहे.

pm narendra modi awarded the ceraweek global Energy And Environment Leadership Award | पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आणखी एक मोठा सन्मान, ग्लोबल एनर्जी अँड एनव्हायरमेंट लीडरशीप पुरस्कार जाहीर

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आणखी एक मोठा सन्मान, ग्लोबल एनर्जी अँड एनव्हायरमेंट लीडरशीप पुरस्कार जाहीर

Next

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना शुक्रवारी आंतरराष्ट्रीय ऊर्जा परिषदेदरम्यान 'ग्लोबल एनर्जी अँड एनव्हायरमेंट लीडरशीप' पुरस्कारानं गौरविण्यात येणार आहे. पंतप्रधान मोदी उद्या सेरावीक (Ceraweek)  समिटमध्ये संबोधित करणार आहेत. (PM Narendra Modi awarded the ceraweek global Energy And Environment Leadership Award)

सेरावीक ग्लोबल एनर्जी अँड एनव्हायरमेंट लीडरशीप पुरस्काराची सुरुवात २०१९ साली करण्यात आली होती. ग्लोबल एनर्जी आणि पर्यावरण क्षेत्रात उत्तम नेतृत्व करणाऱ्यांना हा पुरस्कार जाहीर केला जातो. 

"भारतात शाश्वत उर्जेवर प्रवेश सुनिश्चित करण्यासाठी आणि शाश्वत भविष्यासाठी हवामानाच्या उद्दीष्टांची पूर्तता करण्यासाठी मोदींचं नेतृत्व महत्वपूर्ण आहे. जगाच्या भविष्यातील ऊर्जेच्या गरजा भागविण्यासाठी शाश्वत विकासासाठी मोदींच्या वचनबद्धतेबद्दल आम्ही त्यांना पुरस्कार जाहीर करत आहोत", असं आयएचएस मार्केटचे व्हाइस चेअरमन आणि कॉन्फरन्सचे अध्यक्ष डॅनियल यर्गिन म्हणाले.  

डॉक्टर डॅनियल यर्गिन यांनी १९८३ साली 'सेराविक'ची स्थापना केली होती. त्यानंतर दरवर्षी माच महिन्यात ह्यूस्टन येथे सेराविकचं आयोजन केलं जातं. जगातील अग्रणी ऊर्जा व्यासपीठांमध्ये या परिषदेचा समावेश आहे. पण यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे या परिषदेचं डिजिटल पद्धतीनं आयोजन करण्यात आलं आहे. 

Web Title: pm narendra modi awarded the ceraweek global Energy And Environment Leadership Award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.