ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 12:48 IST2025-12-25T12:45:23+5:302025-12-25T12:48:39+5:30

कॅथेड्रल चर्च त्यांच्या सुंदर वास्तुकलेसाठी ओळखले जाते. दरवर्षी नाताळासाठी इथे विशेष सजावट केली जाते.

PM Narendra Modi attend Christmas morning service at The Cathedral Church of the Redemption in delhi | ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी

ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ख्रिसमसनिमित्त दिल्लीतील कॅथेड्रल चर्च ऑफ द रिडेम्पशनमध्ये पोहोचले आणि तिथे प्रार्थना सभेत सहभाग घेतला. दिल्लीतील ऐतिहासिक कॅथेड्रल चर्च हे सर्वात जुन्या चर्चपैकी एक आहे. याठिकाणी पंतप्रधान मोदी यांनी भेट देत ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या. त्यावेळी चर्चेमध्ये मोदींसह अनेक लोक उपस्थित होते. हे चर्च सेंट्रल सेक्रेटेरिएट मेट्रो स्टेशनजवळच आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या सोशल मिडिया अकाऊंटवर हे फोटो पोस्ट करत म्हटलंय की, दिल्लीतील कॅथेड्रल चर्च ऑफ द रिडेम्पशनमध्ये नाताळच्या सकाळी होणाऱ्या प्रार्थनेत सहभागी झालो. ही प्रार्थना प्रेम, शांती आणि करुणेचा शाश्वत संदेशाचे प्रतिक आहे. नाताळची भावना आपल्या समाजात सुसंवाद आणि बंधुता आणेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पंतप्रधान मोदी यांच्या स्वागतासाठी इथे फार विशेष आयोजन करण्यात आले नाही. पंतप्रधान शांततेत इथे पोहचले. सर्वसामान्यासारखे ते प्रार्थनेत सहभागी झाले. त्यानंतर कॅरल्समध्येही ते हजर होते असं येथील बिशप पॉल स्वरुप यांनी सांगितले.

कॅथेड्रल चर्च त्यांच्या सुंदर वास्तुकलेसाठी ओळखले जाते. दरवर्षी नाताळासाठी इथे विशेष सजावट केली जाते. संपूर्ण दिल्लीतील लोक प्रभु येशू ख्रिस्ताला प्रार्थना करण्यासाठी आणि नाताळ साजरा करण्यासाठी या चर्चमध्ये येतात. पंतप्रधान मोदी यापूर्वीही येथे भेट देऊन गेले आहेत. पंतप्रधान मोदींनी दुसऱ्या पोस्टमध्ये चर्चमध्ये जातानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात लिहिलंय, नाताळ नवीन आशा, स्नेह आणि दयाळूपणाची सामायिक वचनबद्धता घेऊन येवो. द कॅथेड्रल चर्च ऑफ द रिडेम्पशन येथे नाताळच्या सकाळच्या प्रार्थनेला गेलेली काही छायाचित्रे त्यांनी पोस्ट केली आहे.


 
मोदींच्या भेटीमुळे गायक आनंदी

पंतप्रधान मोदी दिल्लीतील कॅथेड्रल चर्च ऑफ द रिडेम्पशन येथे हजर राहिल्याबद्दल तेथे उपस्थित असणारी गायिका सारा यांनी त्यांचा आनंद व्यक्त केला. पंतप्रधानांनी संपूर्ण प्रार्थनेत भाग घेतला आणि स्वत: प्रार्थना केली. त्यांनी आमचे गायनही ऐकले. त्यांनी आमच्यासोबत ख्रिसमस साजरा केला हे खूप छान होते..हा एक अद्भुत अनुभव होता अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. 

Web Title : क्रिसमस पर पीएम मोदी ने दिल्ली के चर्च में प्रार्थना की

Web Summary : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने क्रिसमस के मौके पर दिल्ली के कैथेड्रल चर्च ऑफ द रिडेम्पशन में प्रार्थना सभा में भाग लिया। उन्होंने प्रेम, शांति और करुणा का संदेश दिया और समाज में सद्भाव की कामना की। एक गायिका ने पीएम मोदी की उपस्थिति पर खुशी जताई।

Web Title : PM Modi Visits Delhi Church on Christmas Morning, Attends Prayer

Web Summary : Prime Minister Narendra Modi attended Christmas morning prayers at Delhi's Cathedral Church of the Redemption, a historic church. He shared a message of love, peace, and compassion, expressing hope for harmony and goodwill in society. A choir singer expressed joy at PM Modi's participation in the service.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.