शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
2
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
4
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
5
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
6
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
7
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
8
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
9
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
10
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
11
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
12
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
13
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
14
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल
15
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
16
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
17
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
18
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
19
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
20
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार

ज्यांची कमाई रोखली, ते बदल्यासाठी एकत्र येताहेत; पंतप्रधान मोदींचं विरोधकांवर टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2019 1:35 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ओडिशातील बलांगीरच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदींनी अनेक विकास योजनांचे लोकार्पण केले.

ओडिशा - पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ओडिशातील बलांगीरच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदींनी झारसुगुडातील मल्टी मॉडेल लॉजिस्टिक्स पार्कसहीत (एमएमएलपी) अनेक विकास योजनांचे लोकार्पण केले. बलांगीर आणि बिचुपलीदरम्यान निर्माण करण्यात आलेल्या नवीन रेल्वेमार्गाचेही उद्घाटन करण्यात आले आहे. उद्घाटन कार्यक्रमानंतर पंतप्रधान मोदींनी उपस्थितांना संबोधित केले. 

येथील जनतेला संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी ओडिशा सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की,'गरीब कुटुंबीयांचे हक्क हिरावून घेणारी प्रत्येक गोष्टी व्यवस्थेतून दूर करण्याचा आमच्या सरकारचा प्रयत्न आहे.आदिवासांच्या हितांसाठी ओडिशा सरकारनं निवडणुकांची वाट पाहत बसू नये, केंद्र सरकारकडून ज्या निधीचा पुरवठा करण्यात आला आहे, त्याचा जनतेच्या भल्यासाठी वापर करावा. निवडणुका येतील आणि जातीलही.

'मला हटवण्यासाठी सर्व एकवटलेत'आपल्या भाषणामध्ये मोदींनी यावेळी विरोधकांनाही अप्रत्यक्षरित्या टार्गेट केले. विरोधकांचा एकजूट होण्याचा प्रयत्न आणि उत्तर प्रदेशातील सपा आणि बसपाच्या आघाडीवर निशाणा साधत मोदी म्हणाले की, 'आज देशात माझ्याविरोधात कटकारस्थानं रचली जात आहेत, खोटे आरोप केले जात आहेत. मोदींना मार्गातून हटवण्यासाठी लोक एकजूट होत आहेत. पण मी तुम्हाला सांगतो की हा चौकीदार गरीबांची कमाई लुटणाऱ्या प्रत्येकाचे खेळ बंद करुनच थांबणार आहे. ज्यांनीही गरीबांना लुटले आहे, त्या सर्वांना हा चौकीदार शिक्षा देऊनच राहील'  

'सरकारचा पैसा खाणाऱ्या मध्यस्थांना संपवलं'भाजपा पक्ष सत्तेत आल्यानंतर आम्ही 6 कोटींहून अधिक बोगस रेशन कार्ड, बोगस गॅस कनेक्शन, बोगस स्कॉलरशिप लाभार्थ्यांना शोधून काढलं. ज्या मध्यस्थी करणाऱ्या व्यक्ती सरकारी पैसा स्वतःच्या खिशात भरत होते, त्या सर्वांना अद्दल घडवण्यात आली.  

'ज्यांची कमाई थांबवली, त्यांना याचा बदला घ्यायचा आहे'पंतप्रधान मोदी पुढे असंही म्हणाले की,आम्ही या मध्यस्थांची झोप उडवली म्हणून मोदी त्यांच्या डोळ्यात खुपू लागलेत. ही लोक जी सबसिडीचे 90 हजार कोटी रुपयांची लूट करत होते, ही लूट करण्यापासून मी या सर्वांना रोखले. सरकारी पैशांतून ही लोक विमानातून प्रवास करत होते, गाडी-बंगले विकत घेत होते. ज्यांच्या तिजोरीत सरकारी पैसा येणे थांबलं, म्हणून ते सर्वजण आता माझ्यावर सूड उगवण्यासाठी एकत्र येत आहेत.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीmayawatiमायावतीOdishaओदिशा