शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
6
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
7
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
9
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
10
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
11
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
12
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
13
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
14
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
15
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
16
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
17
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
18
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
19
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

चौकीदार विश्रांती घेत नसल्यानं चोरांची झोप उडाली- पंतप्रधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2018 17:36 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींची विरोधकांवर जोरदार टीका

धर्मशाला: देशाचा चौकीदार विश्रांती घ्यायला तयार नाही. त्यामुळे चोरांची झोप उडाली आहे, अशा शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांना लक्ष्य केलं आहे. हिमाचल प्रदेशातील जयराम ठाकूर सरकारच्या पहिल्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित जन आभार रॅलीला संबोधित करताना मोदींनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. एक पद, एक निवृत्ती वेतनावरुन काँग्रेस पक्षानं खोटं आश्वासन दिलं. पंजाब आणि कर्नाटकात काँग्रेसनं शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ दिलाच नाही, अशी टीका मोदींनी केली. काँग्रेसप्रणित यूपीए सरकारनं हिमाचल प्रदेशला सापत्नपणाची वागणूक दिल्याचा आरोप पंतप्रधानांनी केला. 'यूपीए सरकारकडून हिमाचल प्रदेश सरकारला २१ हजार कोटी रुपये दिले जायचे. मात्र आताचं एनडीए सरकार राज्याला ७२ हजार कोटी रुपये देतं आहे,' अशी आकडेवारी मोदींनी सांगितली. हिमाचलमध्ये आल्यावर घरी आल्यासारखं वाटतं, असंदेखील ते पुढे म्हणाले.'शौर्य, सामर्थ्य या भूमीवरील प्रत्येकाच्या रक्तात आहे. हिमाचल देवी आणि देवतांची भूमी आहे. इथलं प्रत्येक गाव देवी-देवतांचं आहे. इथल्या शांतीच्या कुशीतून शौर्य जन्माला येतं. हीच हिमाचलची ओळख आहे. एक वर्षात हिमाचल सरकारनं विकासासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो,' अशा शब्दांमध्ये मोदींनी राज्य सरकारचं कौतुक केलं.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेसHimachal Pradeshहिमाचल प्रदेश