शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

...तर पाकिस्तानचं एकही विमान वाचलं नसतं- पंतप्रधान मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2019 16:30 IST

मोदींची पाकिस्तानसह विरोधकांवर जोरदार टीका

जामनगर: एअर स्ट्राइकवरुन प्रश्न विचारणाऱ्या विरोधकांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जोरदार पलटवार केला. दहशतवाद संपावा ही देशवासीयांची इच्छा आहे. त्यासाठी सैन्याची कारवाई सुरू आहे. मात्र काही लोकांना सैन्याच्या कारवाईवर विश्वास नाही, अशा शब्दांमध्ये मोदींनी विरोधकांवर सडकून टीका केली. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा राफेलच्या मुद्द्यावरुन काँग्रेसला लक्ष्य केलं. हवाई हल्ल्याच्यावेळी आपल्याकडे राफेल विमान असतं, तर आपलं एकही विमान कोसळलं नसतं आणि त्यांचं एकही विमान वाचलं नसतं, असं म्हणत मोदींनी राफेल करारासाठी काँग्रेसनं प्रचंड वेळ घालवल्याची टीका केली. मोदी सध्या गुजरातच्या दौऱ्यावर आहेत.मोदींनी जामनगरमधील त्यांच्या सभेत पाकिस्तान आणि विरोधी पक्षांवर तोंडसुख घेतलं. 'भारताला उद्ध्वस्त करण्याचा मानस बाळगणाऱ्यांना हा देश सोडणार नाही,' अशा शब्दांमध्ये मोदींनी पाकिस्तानला इशारा दिला. 'दहशतवाद हा आजार आहे आणि आम्ही त्या आजाराच्या मूळावर घाव घालत आहोत. शेजारचा देश दहशतवादाचं मूळ आहे. त्यामुळे आम्ही दहशतवादाचा मूळापासून निपटारा करत आहोत,' असं मोदी म्हणाले. यावेळी मोदींनी विरोधकांवर तोफ डागली. विरोधकांचा सैन्यावर विश्वास नाही. मात्र आम्हाला सैन्याचा अभिमान वाटतो, असं त्यांनी म्हटलं. यावेळी पंतप्रधानांनी राफेल विमानाचा मुद्दादेखील उपस्थित केला. आज आपल्या हवाई दलाकडे राफेल असतं, तर आपलं एकही विमान जमीनदोस्त झालं नसतं आणि त्यांचं (पाकिस्तानचं) एकही विमान वाचलं नसतं, असं मोदी म्हणाले. आम्हाला दहशतवाद संपवायचा आहे. दहशतवाद संपवणं हेच आमचं ध्येय आहे. मात्र त्यांना केवळ मोदीला संपवायचं आहे, अशी टीका त्यांनी केली. मोदींनी कालही राफेलच्या मुद्यावरुन राहुल गांधींना लक्ष्य केलं होतं. त्यावेळी ते राहुल यांचा बालेकिल्ला असलेल्या अमेठीत होते. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRafale Dealराफेल डीलindian air forceभारतीय हवाई दलIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकBJPभाजपाRahul Gandhiराहुल गांधी