शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

राम मंदिराला होणाऱ्या विलंबासाठी काँग्रेसच कारणीभूत, नरेंद्र मोदींचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2018 16:55 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानमधील अलवर येथे झालेल्या सभेत राम मंदिराप्रकरणी सुरू असलेल्या न्यायालयीन प्रक्रियेत काँग्रेसकडून हस्तक्षेप होत असल्याचा आरोप केला.

अलवर ( राजस्थान) - राम मंदिराच्या मुद्द्यावरून हिंदुत्ववादी संघटनांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे सध्या अयोध्येतील आणि देशातील वातावरण तापले आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानमधील अलवर येथे झालेल्या सभेत राम मंदिराप्रकरणी सुरू असलेल्या न्यायालयीन प्रक्रियेत काँग्रेसकडून हस्तक्षेप होत असल्याचा आरोप केला. तसेच काँग्रेस नेत्यांनीच सर्वोच्च न्यायालयामध्ये राम मंदिराची सुनावणी टाळण्याची अपील केली होती, असाही आरोप मोदींनी केला. अलवर येथील रॅलीमध्ये मोदी म्हणाले, अयोध्येचा खटला सुरू होता तेव्हा काँग्रेसचे नेते आणि राज्यसभा सदस्य म्हणाले की, राम मंदिराचा खटला २०१९ पर्यंत चालवू नका, कारण २०१९ मध्ये निवडणुका आहेत. देशातील न्यायव्यवस्थेला अशा प्रकारच्या राजकारणामध्ये योग्य आहे का?" असा सवालही मोदींनी केला. 

'' सर्वोच्च न्यायालयाचे कुठलेही न्यायाधीश अयोध्येसारख्या गंभीर आणि संवेदनशील  प्रकरणी न्यायदान करण्याच्या दिशेने सर्वांचे मत ऐकूण घेण्याचा प्रयत्न करत होते. तेव्हा काँग्रेसचे राज्यसभेमधील एक खासदार आणि वकीलांनी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींविरोधात महाभियोग आणून त्यांना घाबरवले होते. आता काँग्रेसवाल्यांनी न्यायमूर्तींना घाबरवण्याचे- धमकावण्याचे काम सुरू केले आहे," असा आरोपही मोदींनी केला. तसेच काँग्रेसकडे विकासाच्या मुद्द्यावर चर्चा करण्याची हिंमत नाही. त्यामुळे त्यांनी मोदींच्या जातीचा मुद्दा समोर आणला आहे, असा आरोपही मोदींनी केली.

टॅग्स :Rajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूकRajasthanराजस्थानNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसAyodhyaअयोध्या