शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

वाजपेयींची प्रकृती चिंताजनक; पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक नेत्यांची एम्सकडे धाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2018 06:53 IST

अटल बिहारी वाजपेयी यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे

नवी दिल्ली:  माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची प्रकृती खालावली असून, त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. वाजपेयी यांच्या प्रकृतीबाबत एम्स रुग्णालयाकडून मेडिकल बुलेटिन जारी करण्यात आले असून, गेल्या 24 तासांमध्ये त्यांची प्रकृती अधिकच खाल्यावल्याचे सांगण्यात आले आहे. वाजपेयी यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  एम्समध्ये जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे. तसेच सुरेश प्रभू, स्मृती इराणी यांच्यासह इतर नेत्यांनीही एम्समध्ये जाऊन वाजपेयी यांच्या प्रकृतीचा माहिती घेतली. अटल बिहारी वाजपेयी यांच्यावर 11 जून 2018 पासून एम्समध्ये उपचार सुरू आहेत. किडनीच्या आजारानं त्रस्त असलेल्या 93 वर्षांच्या वाजपेयींची प्रकृती गंभीर आहे. याशिवाय त्यांना स्मृतीभ्रंशही झाला आहे. वाजपेयी यांची प्रकृती खालावल्यानं नरेंद्र मोदी त्यांच्या भेटीसाठी एम्समध्ये पोहोचले आहेत. त्याआधी काही वेळापूर्वीच केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी वाजपेयींची भेट घेतली होती. 

महिन्याभरापूर्वीदेखील अटल बिहारी वाजपेयींची प्रकृती खालावल्याचं एम्स रुग्णालयानं सांगितलं होतं. त्यावेळी त्यांना मूत्र संसर्ग झाला होता. त्यावेळी पंतप्रधान मोदींसह केंद्रीय मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांनी वाजपेयींची भेट घेतली होती. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीही वाजपेयींची भेट घेतली होती. 

टॅग्स :Atal Bihari Vajpayeeअटल बिहारी वाजपेयीNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा