शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

भ्रष्टाचाराच्या कारवाईविरोधात विरोधकांची एकजूट - पंतप्रधान नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2018 19:19 IST

केंद्रातील मोदी सरकारला आज चार वर्ष पूर्ण होत आहेत.

कटक - केंद्रातील मोदी सरकारला आज चार वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्त भाजपा आणि मोदी सरकारमधील मंत्री, सरकारनं केलेली काम- राबवलेल्या योजना यांसहीत अन्य गोष्टींचे रिपोर्ट कार्ड जनतेसमोर मांडण्यात व्यस्त आहेत. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही  ओडिशातील कटक येथे जनतेला संबोधित करताना त्यांनी आपल्या सरकारचे रिपोर्ट कार्ड सादर केले. 

(राहुल गांधींनी मोदी सरकारला दिलं 'एफ' ग्रेड)

सरकारनं केलेल्या कामाचं कौतुक करत असताना दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला केला. सोनिया गांधी यांच्यावर निशाणा साधत पंतप्रधान मोदी म्हणाले की, आम्ही जनपथहून सरकार चालवत नाही. शिवाय काळा पैसा आणि भ्रष्टाचारविरोधात सुरू करण्यात आलेल्या मोहीमबाबत त्यांनी सांगितले की, आम्ही JAM म्हणजे जनधन, आधार आणि मोबाइलच्या माध्यामातून 80,000 कोटी रुपये चुकीच्या हातांमध्ये जाण्यापासून वाचवले. 

मोदी पुढे असंही म्हणाले, देशात सध्या कन्फ्युजनवालं नव्हे तर कमिटमेंटवालं सरकार आहे. त्यामुळेच देशात ‘सर्जिकल स्ट्राईक्स’ सारखे महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जात आहेत. त्याचबरोबर ‘वन रँक वन पेन्शन’ सारखा अनेक दशकांपासून अडकलेला निर्णय लागू होतो.

दरम्यान, यावेळी मोदींनी जनतेला भावनिक साद घालण्याचाही प्रयत्न केला. ''तुमच्या इच्छा-आकांक्षा, स्वप्ने आणि आशाच मला काम करण्यासाठी प्रेरणा देत असतात, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. आमचे असे सरकार आहे ज्यांचा राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान हे सर्वजण गरीबीतून पुढे आलेले आहेत. त्यामुळे मोदी सरकार हे गरीबांसाठीचे सरकार आहे. काँग्रेसला हे का कळले नाही की, यापूर्वी गरीबांना बँका दारातही उभ्या करीत नव्हत्या. गरीबांनाही काही मूल्ये आहेत, त्यांनाही जीवन विम्याची गरज असते हे काँग्रेसला आजवर का कळू शकले नाही? असा सवाल यावेळी मोदींनी विचारला.

शिवाय, आपला देश बदलू शकतो, असं गेल्या चार वर्षांत 125 कोटी भारतीयांना वाटते आहे. आज देश काळ्या पैशापासून ‘जनधन’कडे अर्थात वाईट सरकारकडून चांगल्या सरकारकडे वळला आहे, असे म्हणत पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर जोरदार हल्लोबाल चढवला. 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेस