मोदी हे विष्णूचे 11वे अवतार; भाजपा नेत्याचा जावईशोध
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2018 17:37 IST2018-10-12T17:33:40+5:302018-10-12T17:37:17+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचा अकरावा अवतार असल्याचं ट्विट भाजपा नेते अवधूत वाघ यांनी केलं आहे. त्यांच्या या विधानावर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे.

मोदी हे विष्णूचे 11वे अवतार; भाजपा नेत्याचा जावईशोध
मुंबई: पंतप्रधाननरेंद्र मोदी हे विष्णूचा अकरावे अवतार असल्याचं ट्विट भाजपा नेते अवधूत वाघ यांनी केलं आहे. त्यांच्या या विधानावर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. अवधूत वाघ यांनी इंग्रजी आणि मराठीमध्ये हे ट्विट केलं आहे.
भारताचे पंतप्रधान परम आदरणीय श्री नरेंद्र मोदी जी हे श्री विष्णु चे अकरावे अवतार आहेत
— Avadhut Wagh (@Avadhutwaghbjp) October 12, 2018
'भारताचे पंतप्रधान परम आदरणीय श्री नरेंद्र मोदी जी हे श्री विष्णूचे अकरावे अवतार आहेत', असं भाजपाचे प्रवक्ते अवधूत वाघ यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. दुपारी 12 च्या सुमारास त्यांनी हे ट्विट केलं. त्यांच्या या विधानावर विरोधकांनी जोरदार टीका केली आहे. अवधूत वाघ यांच्या विधानाला फारसं गांभीर्यानं घेण्याची गरज नसल्याचं राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. अवधूत वाघ बरेच पक्ष फिरुन आले आहेत. त्यामुळे त्यांच्या विधानाकडे फार लक्ष देऊ नये, असं आव्हाड म्हणाले.