पंतप्रधान मोदींच्या पत्नी जशोदाबेन थोडक्यात बचावल्या; कार अपघातात ड्रायव्हरचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2018 14:05 IST2018-02-07T11:17:56+5:302018-02-07T14:05:37+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जसोदाबेन यांच्या गाडीला बुधवारी सकाळी राजस्थानात बेगू जवळ अपघात झाला.  या अपघातात गाडीच्या चालकाचा  मृत्यू झाला आहे.

PM Modi's Wife Injured In Accident In Rajasthan, 1 Reportedly Dead | पंतप्रधान मोदींच्या पत्नी जशोदाबेन थोडक्यात बचावल्या; कार अपघातात ड्रायव्हरचा मृत्यू

पंतप्रधान मोदींच्या पत्नी जशोदाबेन थोडक्यात बचावल्या; कार अपघातात ड्रायव्हरचा मृत्यू

जयपूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जसोदाबेन यांच्या गाडीला बुधवारी सकाळी राजस्थानात बेगू जवळ अपघात झाला.  या अपघातात गाडीच्या चालकाचा  मृत्यू झाला आहे. जसोदाबेन या अपघातात जखमी झाल्या असून त्यांच्या डोक्याला मार लागला आहे.  कोट्टा-चितौड महामार्गावर हा अपघात झाला. जसोदाबेन यांची गाडी अतरुहून उदयपूरच्या दिशेने जात असताना सकाळी दहाच्या सुमारास हा अपघात झाला. जसोदाबेन यांना चितौडगड येथील रुग्णालयात दाखल केले आहे. 

त्यांना मार लागला असला तरी प्रकृतीला धोका नाही असे उपचार करणा-या डॉक्टरांनी सांगितले. जसोदाबेन यांच्या गाडीने ट्रेलर ट्रकला धडक दिली. अपघात इतका भीषण होता कि, गाडीचा चक्काचूर झाला आहे. या प्रकरणी राजस्थान पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपी ट्रक ड्रायव्हरला अटक केली आहे. राजेश राजोरा यांनी माहिती दिली. 



 

जसोदाबेन निवृत्त शिक्षिका असून त्या ब्राम्हणवाडा येथे राहतात. मोदींच्या वडनगर या गावापासून 35 किलोमीटर अंतरावर त्यांचे गाव आहे. जसोदाबेन मेहसाणा जिल्ह्यात उन्झा येथे भाऊ अशोक मोदींसोबत राहतात. मेहसाणा पोलिसांनी त्यांना सुरक्षा दिली आहे. 

Web Title: PM Modi's Wife Injured In Accident In Rajasthan, 1 Reportedly Dead

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.