शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
4
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
5
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
6
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
7
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
8
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
9
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
10
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
11
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
12
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
13
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
14
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
15
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
16
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
17
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
18
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
19
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
20
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!

संधी ओळखण्याची हीच खरी वेळ; मोदींनी सांगितले, भारतीयांच्या मनातील 'जर'!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2020 15:21 IST

मोदी म्हणाले, समस्यांवरील औषध बळकट होणे हे आहे. कठीण काळाने नेहमीच भारताची इच्छाशक्ती वाढवली आहे. कोरोनानंतर आत्मनिर्भर भारत बनवण्याच्या दिशेने आपल्याला पावले टाकायची आहेत.

ठळक मुद्देमोदी इंडियन चेम्बर ऑफ कॉमर्सच्या एका विशेष कार्यक्रमात बोलत होतेआता प्रत्येक भारतीय नागरिक या संकटाचं संधीत रुपांतर करण्याच्या इच्छाशक्तीने काम करत आहे - मोदीआता लोकलपासून व्होकल आणि एक्सपोर्टर बनन्याची वेळ

नवी दिल्ली : संपूर्ण जग आज कोरोनाविरुद्ध लढत आहे. यात भारतही मागे नाही. मात्र, आता प्रत्येक भारतीय नागरिक या संकटाचं संधीत रुपांतर करण्याच्या इच्छाशक्तीने काम करत आहे. ज्या क्षेत्रात भारत मागे आहे. त्या क्षेत्रात आत्मनिर्भर होण्याची हीच संधी आहे, असे पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. एवढेच नाही, तर आज आपल्या मनात एक मोठा 'जर' निर्माण होत आहे, असेही मोदी म्हणाले. ते इंडियन चेम्बर ऑफ कॉमर्सच्या एका विशेष कार्यक्रमात बोलत होते. पंतप्रधानांनी आपल्या भाषणाची सुरुवात बंगाली भाषेत केली. हा कार्यक्रम कोलकात्यात पार पडत आहे.

पंतप्रधानांनी सांगितले, भारतीयांच्या मनातील 'जर'...इंडियन चेम्बर ऑफ कॉमर्सच्या कार्यक्रमत मोदी म्हणाले, आज प्रत्येक भारतीयाच्या मनात एक 'जर' आहे, जर आपण वैद्यकीय उपकरणे तयार करण्याच्या क्षेत्रात आत्मनिर्भर झालो... जर आपण कोळसा आणि खनिजांच्या क्षेत्रांत स्वयंपूर्ण झालो... जर आपण खान्याच्या तेलाच्या उत्पादनात समोर आलो... जर खताच्या उत्पादनात भारत स्वावलंबी झाला... जर इलेक्ट्रॉनिक उपकरणे तयार करण्यात भारत स्वयंपूर्ण झाला... असे अनेक 'जर' आज भारतीयांच्या मनात आहेत. गेल्या 5-6 वर्षांत भारताच्या आत्मनिर्भरतेचे लक्ष्य सर्वप्रथम राहिले आहे. कोरोना संकटाने याची गती आणखी वाढवण्याचा धडा दिला आहे. यातूनच आत्मनिर्भर भारत अभियान पुढे आले आहे.

...अन् तेव्हापासून मुलं होणं बंद झालं, पोट धरून हसवणारी लालूप्रसादांची उत्तरं अन् किस्से

समस्यांवरील औषध बळकट होणे आहे -मोदी म्हणाले, समस्यांवरील औषध बळकट होणे हे आहे. कठीण काळाने नेहमीच भारताची इच्छाशक्ती वाढवली आहे. कोरोनानंतर आत्मनिर्भर भारत बनवण्याच्या दिशेने आपल्याला पावले टाकायची आहेत. प्रत्येक भारतीयाच्या मनात हा प्रश्न नक्कीच निर्माण होत असेल, की भारत या-या क्षेत्रांमद्ये आत्मनिर्भर बनू शकतो.

कोरोनाला नक्कीच पराभूत करू -पंतप्रधान मोदी म्हणाले, आपण संपूर्ण तागदीनिशी कोरोनाचा सामना करत आहोत. आपण त्यावर नक्कीच विजय मिळवू. आपले कोरोना योद्धे त्याचा सामना करत  आहेत. 

CoronaVirus News: उन्हामुळे कोरोनाचा संसर्ग कमी होईल की वाढेल? संशोधकांनी दिली धक्कादायक माहिती

आता लोकलपासून व्होकल आणि एक्सपोर्टर बनन्याची वेळ -'कुटुंबातही मुलगा अथवा मुलगी जेव्हा 18-20 वर्षांचे होतात, तेव्हा आई-वडील म्हणतात, की आपल्या पायावर उभे राहायला शिका. आपण आत्मनिर्भर होण्याचा पहिला धडा घरातूनच शिकतो. भारतालाही आपल्या पायावर उभे राहावे लागेल. भारताने परावलंबित्व कमी करावे. दुसऱ्या देशांवर कमितकमी अवलंबून राहावे. जी गोष्ट भारताला आयात करावी लागते, ती भारतातच कशी तयार होईल? आणि भविष्यात भारतच त्या गोष्टींचा एक्पोर्टर कसा बनेल? या दिशेने आपल्याला काम करावे लागेल. लोकलसाठी व्होकल होण्याची वेळ आहे. देशाला आणि प्रत्येक जिल्ह्याला आता आत्मनिर्भर बनवण्याची वेळ आहे,' असेही मोदी म्हणाले.

दिलासादायक : जगातल्या 'या' पहिल्या शहरात 'हर्ड इम्यूनिटी'नं होतोय कोरोनाचा खात्मा! पण...

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीbusinessव्यवसायICCआयसीसीwest bengalपश्चिम बंगालprime ministerपंतप्रधानIndiaभारत