...अन् तेव्हापासून मुलं होणं बंद झालं, पोट धरून हसवणारी लालूप्रसादांची उत्तरं अन् किस्से

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2020 12:54 PM2020-06-11T12:54:37+5:302020-06-11T13:27:16+5:30

राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव देशातील एक वजनदार नेते मानले जातात. त्यांच्या बोलण्याचा अंदाज, बिनधास्तपणा आणि व्यंगात्मक स्वभाव इतर कोणत्याही नेत्यापेक्षा वेगळी आहे. आज (11 जून) त्यांचा 73वा वाढदिवस. 11 जून 1948 रोजी जन्मलेल्या या नेत्याचे नाव जेव्हा-जेव्हा कानावर पडते, तेव्हा-तेव्हा लालू प्रसादांची एक वेगळीच छबी डोळ्यासमोर उभी राहते.

सध्या लालू प्रसाद चारा घोटाळा प्रकरणी रांचीच्या होटवार कारागृहात शिक्षा भोगत आहेत. मात्र, त्यांचे विनोदी बोलणे आणि व्यंग्यात्मक विधाने आजही लोकांच्या तेवढेच स्मरणात आहेत. कितीही गंभीर वातावरण असो, त्यांचा व्यंगात्मक स्वभाव त हलके पुलके करून टाकतो. चला तर एक नजर टाकूया त्यांच्या अशाच काही खास विनोदी विधानांवर.

एक पत्रकारने लालू प्रसादांना सांगितले, लालूजी हेमा मालिनी तुमच्या फॅन आहेत. उत्तर मिळालं, हेमा मालिनी माझ्या फॅन आहेत, तर मीही त्यांचा एयरकंडीशनर आहे.

लालू प्रसाद यादव स्वतःच अनेक वेळा बोलले आहेत, 'जब तक समोसे में रहेगा आलू, तब तक बिहार में रहेगा लालू.'

एका कार्यक्रमात लालू म्हणाले होते, आम्ही बिहारमधील रस्ते हेमा मालिनी यांच्या गाला एवढे मऊ करू.

एकदा लालू प्रसादांना एका महिला पत्रकाराने त्यांच्या नऊ मुलांसंदर्भात प्रश्न केला. यावर लालू म्हणाले, जेव्हापासून मुख्यमंत्री झालोय, मुलं होणंच बंद झालंय.

रेल्वे अपघातावर बोलताना लालू म्हणाले होते, भारतीय रेल्वेची जबाबदारी भगवान विश्वकर्मा यांच्यावर आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेची जबाबदारीही त्यांच्यावरच आहे, माझ्यावर नाही. त्यांचंच काम मी सांभाळात आहे.

एकदा लालू प्रसाद यादव म्हणाले होते, संपूर्ण जगाला माहित करून घ्यायचं आहे, एका गाई-म्हशी पाळणाऱ्याचा मुलगा (ग्वाला) एवढ्या उंचावर कसा गेला. माझ्यात लोकांना एवढा रस, भारतीय लोकशाहीचा विजय आहे.

एकदा पत्रकारने लालूंना विचारले, आरजेडीचं सरकार असताना तुम्ही कधी कॉपीसंदर्भात ऐकले आहे? यावर लालू म्हणाले, नसेल ऐकली, कारण आम्ही विद्यार्थ्यांना संपूर्ण पुस्तकच देऊन टाकतो.

काहीच काम करत नाहीत, असे म्हणत विरोधकांनी लालूंवर टीकेची झोड उठवली होती. यावर लालूंनी उत्तर दिलं होतं, आम्ही एवढे काम करतो, जर आराम केला नाही, तर वेडे होऊन जाऊ.

लालू प्रसाद 2014च्या लोकसभा निवडणुकीच्या काळात म्हणाले होते, 'नरेंद्र मोदी येणाऱ्या काही दिवसांत वेडे होतील. आपल्या देशाचे पंतप्रधान होण्यासाठी ते वेडे होत चालले आहेत.'

आपला 69वा वाढदिवस साजरा करताना, माध्यमांना दिलेल्या एका प्रतिक्रियेत ते आपल्या अंदाजात म्हणाले, 'अभी तो मैं जवान हूं.'

लालू प्रसाद रेल्वे मंत्री होते. तेव्हा एक आर्थिक सिंद्धात मांडताना ते म्हणाले होते, जर गाईचे दूध पूर्णपणे काढले नाही, तर ती आजारी पडते.

यूपीए सरकारमध्ये रेल्वे मंत्रालयाची जबाबदारी सांभाळण्यासंदर्भात लालू म्हणाले होते. आमच्या आईने शिकवले आहे, म्हशीला शेपटीकडून नाही, नेहमी शिंगांकडून पकडायचे. मी आयुष्यात याच तत्वावर चालतो.

बीफ बॅनवर लालू म्हणाले होते. 'गो-रक्षणाचा ढिंढोरा पिटणारे, त्यांच्या घरी कुत्रा पाळतात, गाय नाही. समजलेना कोण आहेत हे लोक.'