शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
3
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
4
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
5
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
6
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
7
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
8
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
9
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
10
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
11
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
12
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
13
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
14
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
15
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
16
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
17
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
18
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
19
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?

पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 13:59 IST

PM Modi Trump Phone Call: 'राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी स्वतः १४ वेळा दावा केला आहे की, त्यांच्या मध्यस्थीमुळे भारत-पाक युद्ध थांबले.'

PM Modi Trump Phone Call: पंतप्रधान नरेंद्र मोदी G7 बैठकीसाठी कॅनडाच्या दौऱ्यावर गेले होते. जगातील अनेक मोठे नेतेही या बैठकीला उपस्थित होते. काही कारणास्तव डोनाल्ड ट्रम्प कॅनडाहून थोडे लवकर निघून गेले, त्यामुळे त्यांची पीएम मोदींशी भेट झाली नाही. पण, ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींशी फोनवर चर्चा केली. ३५ मिनिटे चाललेल्या या चर्चेत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. आता काँग्रेसने यावरुन केंद्र सरकार आणि पंतप्रधानांवर टीका केली आहे.

काँग्रेसचे तिखट प्रश्न...'काँग्रेस नेते जयराम मीडियाशी संवाद साधताना म्हणाले की, पाकिस्तानी फील्ड मार्शल असीम मुनीरला आज व्हाईट हाऊसकडून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत जेवणाचे आमंत्रण मिळाले आहे. असीम मुनीरने जनरल असताना प्रक्षोभक विधान केले, त्यानंतर पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला. आता त्याच असीम मुनीरला व्हाईट हाऊसमध्ये जेवणाचे आमंत्रण देणे, हे आपल्या राजनयिकतेसाठी आणि पंतप्रधान मोदींसाठी एक मोठा धक्का आहे.'

जयराम रमेश पुढे म्हणतात, 'राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतः १४ वेळा दावा केला आहे की, त्यांच्या मध्यस्थीमुळे भारत-पाक युद्ध थांबले. पंतप्रधान मोदी ३७ दिवस या दाव्यावर काहीही बोलले नाही, आता आज परराष्ट्र सचिवांनी म्हटले की, पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी ३५ मिनिटे फोनवर चर्चा केली. आम्ही म्हणतो की, परराष्ट्र सचिवांनी ज्या गोष्टींचा उल्लेख केला, तीच गोष्ट पंतप्रधान मोदी स्वतः सर्वपक्षीय बैठकीत का बोलत नाहीत? संसदेच्या विशेष अधिवेशनात पंतप्रधान मोदींनी तीच गोष्ट सांगावी, अशी आमची इच्छा आहे.

'पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात चर्चा झाली, हे चांगले आहे. आता भारतात परतल्यानंतर पंतप्रधान मोदींनी सर्वपक्षीय बैठक घेऊन विरोधी पक्षांच्या नेत्यांना या संभाषणाची माहिती द्यावी. परंतु आमचा प्रश्न असा आहे की, पंतप्रधान मोदी चर्चेपासून का पळून जात आहेत? या चर्चेबद्दल ट्रम्प काय म्हणतात, हे पाहणे बाकी आहे. तोपर्यंत परराष्ट्र सचिवांनी जे म्हटले, ते आम्ही स्वीकारतो,' असे जयराम रमेश यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले. 

मोदींनी स्वतः सांगावे...शिवसेनेचे नेते संजय राऊत म्हणाले की, 'पंतप्रधान मोदींनी स्वतः ट्रम्प यांच्याशी काय चर्चा केली, ते सांगावे. दुसरे कोणी का बोलत आहेत?' दरम्यान, भारताने कधीही मध्यस्थी स्वीकारली नाही आणि कधीही करणार नाही, या पंतप्रधान मोदींच्या विधानावर सीपीआयचे सरचिटणीस डी राजा म्हणाले की, पंतप्रधान म्हणून, 'मोदींनी देशाला खरोखर काय घडले ते सांगावे. संसद, राजकीय पक्ष आणि भारतातील लोकांना विश्वासात का घेतले जात नाही?' असा प्रश्न त्यांनी विचारला.

मोदी-ट्रम्प यांच्यात ३५ मिनिटांची चर्चापरराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी सांगितल्यानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात झालेल्या ३५ मिनिटांच्या चर्चेत अनेक विषयांवर चर्चा झाली. यादरम्यान, दोन्ही नेत्यांनी इंडो-पॅसिफिक क्षेत्राबाबत आपले विचार मांडले. या प्रदेशात क्वाडच्या महत्त्वाच्या भूमिकेला दोघांनीही पाठिंबा दर्शवला. तसेच, पंतप्रधान मोदींनी क्वाडच्या पुढील बैठकीसाठी ट्रम्प यांना भारत भेटीचे आमंत्रण दिले. 

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाNarendra Modiनरेंद्र मोदीDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पcongressकाँग्रेसBJPभाजपा