फोटोसाठी काय पण! मोदींनी लस घेताना मास्क न लावल्याने खवळले नेटीझन्स, करून दिली 'ही' आठवण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2021 10:53 AM2021-03-01T10:53:49+5:302021-03-01T10:56:22+5:30

(PM Narendra Modi And Corona Vaccine : पंतप्रधान मोदींनी आज सकाळी नवी दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात जाऊन कोरोनाची लस घेतली. यानंतर मोदींनी जनतेला कोरोना लस घेण्याचं आवाहनही केलं.

pm modi took his first dose of covid 19 this is how people are reaction on twitter over mask | फोटोसाठी काय पण! मोदींनी लस घेताना मास्क न लावल्याने खवळले नेटीझन्स, करून दिली 'ही' आठवण

फोटोसाठी काय पण! मोदींनी लस घेताना मास्क न लावल्याने खवळले नेटीझन्स, करून दिली 'ही' आठवण

Next

नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 1,10,96,731 वर पोहोचला आहे.  गेल्या 24 तासांत कोरोनाचे 15,510 नवे रुग्ण आढळून आले आहेत. 106 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 1,57,157 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आजपासून देशामध्ये लसीकरणाच्या आणखी एका टप्प्याला सुरुवात झाली आहे. कोरोनावरील लस उपलब्ध झाली असली तरी अनेकांच्या मनात शंका आहे. कोरोनावरील लस किती प्रभावी ठरेल, त्यामुळे काही साईड इफेक्ट्स तर होणार नाहीत ना, असे अनेक प्रश्न देशवासीयांच्या मनात आहे. ते दूर करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) कोरोनावरील लस (Corona Vaccine) घेतली.

पंतप्रधान मोदींनी आज सकाळी नवी दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात जाऊन कोरोनाची लस घेतली. यानंतर मोदींनी जनतेला कोरोना लस घेण्याचं आवाहनही केलं. एम्समध्ये कोरोना लस घेतल्याची माहिती पंतप्रधान मोदींनी ट्विट करून दिली. आपण देशाला कोरोनामुक्त करू, असा निर्धारदेखील त्यांनी व्यक्त केला. मोदींनी लस घेतानाचा फोटो देखील पोस्ट केला आहे. पण लस घेताना पंतप्रधानांच्या चेहऱ्यावर मास्क नसल्याने अनेकांनी यावरून निशाणा साधला आहे. मोदींनी पोस्ट केलेल्या फोटोखाली काहींनी मास्क न घातल्याबद्दल आक्षेप नोंदवला आहे. 

केरळ-पुदुचेरीची नर्स; आसामचा गमछा, नरेंद्र मोदींच्या कोरोना लशीमागच्या 'इलेक्शन कनेक्शन'ची चर्चा

पंतप्रधानांनी भारत बायोटेक कंपनीच्या कोव्हॅक्सिनचा (Covaxin) पहिला डोस घेतल्याचं सांगण्यात येत आहे. पंतप्रधान मोदींनी लस घेताना आसामी गमछा परिधान केला होता. मोदींना लस टोचणाऱ्या नर्स पुद्दुचेरीच्या होत्या. तर त्यांना सहाय्य करणाऱ्या दुसऱ्या नर्स केरळच्या होत्या. आसाम, पुद्दुचेरी, केरळमध्ये लवकरच विधानसभेच्या निवडणुका आहेत. मोदींनी लस टोचून घेतल्यानंतर काहींनी याकडे लक्ष वेधलं. त्यामुळे मोदींनी घेतलेली कोरोना लस आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपसाठी बूस्टर डोस ठरणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे. तर दुसरीकडे मोदींनी मास्क न लावल्यामुळे नेटकरी संतापले असून मोदींवर निशाणा साधण्यात येत आहे. मास्क लावण्य़ाची आठवण करून देण्यासाठी काहींनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन यांचा फोटो शेअर केला आहे. बायडन यांनी लस घेताना मास्क लावलेला फोटोही पोस्ट करत टोला लगावला आहे. 

Web Title: pm modi took his first dose of covid 19 this is how people are reaction on twitter over mask

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.