शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
2
"काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
3
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
4
रिपाईला एकही जागा मिळाली नाही, पण मला कॅबिनेट मिळणार - रामदास आठवले
5
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
6
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
7
स्वाती मालिवाल मारहाण: विभव कुमार यांना मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक, पोलीस ठाण्यात धक्काबुक्की
8
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
9
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
10
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
11
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
12
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
13
'महिलांचा आदर कसा करावा हे..'; हिजाब घातलेल्या मुलीला पाहून शाहरुखची थक्क करणारी रिॲक्शन
14
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
15
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
16
मोहिनी एकादशी: शुभ योगांत ‘असे’ करा पूजन, मिळेल उत्तम फल; पाहा, मुहूर्त अन् काही मान्यता
17
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
18
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
19
"हिंदुत्व भेकडासारखं पळून जाऊन...", किरण मानेंनी सत्ताधाऱ्यांचा घेतला खरपूस समाचार
20
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?

'त्यांचे' आवाज ऐका; शेवटच्या पुस्तकातून प्रणव मुखर्जींचा पंतप्रधान मोदींना सल्ला

By कुणाल गवाणकर | Published: January 06, 2021 8:53 AM

मुखर्जी यांच्या 'द प्रेसिडेंशियल इयर्स, 2012-2017' पुस्तकाचं प्रकाशन

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी असहमत असलेल्यांचे आवाज ऐकायला हवेत. विरोधकांना समजवण्यासाठी आणि देशातील जनतेला विविध विषयांची माहिती देण्यासाठी मोदींनी संसदेचा वापर एक व्यासपीठ म्हणून करायला हवा. त्यांनी संसदेत जास्त बोलायला हवं,  असं मत दिवंगत माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी त्यांच्या 'द प्रेसिडेंशियल इयर्स, 2012-2017' या पुस्तकात व्यक्त केलं आहे. पंतप्रधानांच्या उपस्थितीमुळे संस्थेच्या कामकाजात बराच फरक पडतो, असं निरीक्षणही त्यांनी नोंदवलं आहे. देशात मनमोहन सिंग यांचं सरकार असताना प्रणब मुखर्जी राष्ट्रपती झाले. २०१४ मध्ये देशात सत्ताबदल झाला आणि नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची सूत्रं हाती घेतली. त्यामुळे दोन पंतप्रधानांची कार्यशैली मुखर्जी यांनी जवळून पाहिली. याच कार्यकाळातील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुखर्जी यांनी 'द प्रेसिडेंशियल इयर्स, 2012-2017' हे पुस्तक लिहिलं आहे. काल या पुस्तकाचं प्रकाशन झालं. 'जवाहरलाल नेहरू असो वा इंदिरा गांधी, अटल बिहारी वाजपेयी किंवा मग मनमोहन सिंग, या सगळ्याच पंतप्रधानांनी सदनाला कायम आपल्या उपस्थितीची जाणीव करून दिली,' असं मुखर्जी यांनी त्यांच्या शेवटच्या पुस्तकात म्हटलं आहे.संसदीय राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या, अर्थमंत्री, संरक्षणमंत्री, परराष्ट्रमंत्री भूषवलेल्या प्रणव मुखर्जींनी त्यांच्या पुस्तकातून मोदींना महत्त्वाचा सल्ला दिला आहे. 'पंतप्रधान पदाच्या दुसऱ्या टर्ममध्ये पंतप्रधान मोदींनी आपल्या पूर्वसुरींकडून प्रेरणा घ्यायला हवी. पहिल्या टर्ममध्ये मोदी सरकारला अनेकदा संसदीय संकटांचा सामना करावा लागला. अशी संकटं टाळण्यासाठी मोदींनी संसदेच्या कामकाजावेळी उपस्थित राहायला हवं,' असा मोलाचा सल्ला मुखर्जींनी दिला आहे.पंतप्रधान मोदींनी असंतुष्टांचे आवाज ऐकायला हवेत. संसदेत जास्त वेळा बोलायला हवं. विरोधकांना समजावण्यासाठी आणि देशाशी संवाद साधण्यासाठी, नागरिकांना महत्त्वाच्या विषयांची माहिती देण्यासाठी त्यांनी संसदेचा वापर एक व्यासपीठ म्हणून करायला हवा, असं मत मुखर्जी यांनी व्यक्त केलं आहे. 'संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळात मी विरोधकांच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या नेत्यांच्याही संपर्कात होतो. अनेक जटिल मुद्द्यांचं निराकरण करण्यासाठी हा संपर्क कामी यायचा,' असा अनुभव त्यांनी पुस्तकात नमूद केला आहे. 

टॅग्स :Pranab Mukherjeeप्रणव मुखर्जीManmohan Singhमनमोहन सिंगIndira Gandhiइंदिरा गांधीJawaharlal Nehruजवाहरलाल नेहरू