पंतप्रधान मोदींच्या कुशीतला 'तो' चिमुकला कोण? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2019 16:59 IST2019-07-23T16:50:36+5:302019-07-23T16:59:14+5:30

सोशल मीडियावर चर्चेला उधाण

PM Modi Posted a Photo with a Special Friend in Parliament and social media Wants to Know Who it is | पंतप्रधान मोदींच्या कुशीतला 'तो' चिमुकला कोण? जाणून घ्या...

पंतप्रधान मोदींच्या कुशीतला 'तो' चिमुकला कोण? जाणून घ्या...

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एका चिमुकल्यासोबतचे काही फोटोज सोशल मीडियावर शेअर केले आहेत. मोदींनी त्यांच्या फेसबुक आणि इस्टाग्रामवरुन फोटो शेअर करताना चिमुकल्याला 'स्पेशल फ्रेंड' म्हटलं आहे. यानंतर मोदींच्या कुशीतला तो चिमुकला कोण याची चर्चा सध्या सोशल मीडियावर जोरात सुरू आहे. सोशल मीडियावर अनेकांनी याबद्दल वेगवेगळे अंदाज व्यक्त केले आहेत. 

मोदींनी त्यांच्यासोबत असलेल्या मुलाला 'स्पेशल फ्रेंड' म्हटलं आहे. 'आज संसदेत एक स्पेशल फ्रेंड मला भेटायला आला,' असं शीर्षक देऊन मोदींनी सोशल मीडियावर फोटो शेअर केले. यातील एका फोटोत मोदी चिमुरड्यासोबत खेळताना दिसत आहेत. समोरच्या टेबलवर असणारी चॉकलेट्स घेण्याचा प्रयत्न लहानग्याकडून सुरू आहे. तर दुसऱ्या चिमुकल्याच्या हातात चॉकलेट असल्याचं पाहायला मिळत आहे. 



मोदींच्या 'स्पेशल फ्रेंड'ची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. फेसबुक, इन्स्टाग्रामवर या फोटोंना लाखो लोकांनी लाईक केलं असून या फोटोंवर अक्षरश: कमेंट्सचा पाऊस पडला आहे. 





काहींना हा चिमुकला गृहमंत्री अमित शहांचा नातू वाटला. 







मोदींनी 'स्पेशल फ्रेंड' म्हटलेला हा चिमुकला भाजपाचे वरिष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार सत्यनारायण जटिया यांचा नातू आहे. मोदींनी याआधी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्या कुटुंबासोबतचा फोटो शेअर केला होता. त्यात त्यांनी एका लहान मुलीचे कान धरले होते. 
 

Web Title: PM Modi Posted a Photo with a Special Friend in Parliament and social media Wants to Know Who it is

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.