पवित्र त्रिवेणी संगमान स्नान, साधू-संतांच्या भेटी; पाहा पीएम मोदींच्या महाकुंभ दौऱ्याचे वेळापत्रक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 21:13 IST2025-02-04T21:11:58+5:302025-02-04T21:13:46+5:30
PM Modi Maha Kumbh Visit: प्रयागराजमध्ये 13 जानेवारीपासून महाकुंभ 2025 सुरू झाला आहे. हा जगातील सर्वात मोठा आध्यात्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम मानला जातो.

पवित्र त्रिवेणी संगमान स्नान, साधू-संतांच्या भेटी; पाहा पीएम मोदींच्या महाकुंभ दौऱ्याचे वेळापत्रक
PM Modi Maha Kumbh Visit: दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी उद्याउद्या(5 फेब्रुवारी 2025) मतदान होत आहे. पण, यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयागराज येथे महाकुंभात जाणार आहेत. सकाळी 11 वाजता ते पवित्र त्रिवेणी संगमान स्नान करतील आणि गंगा मातेची पूजा करतील.
प्रयागराजमध्ये 13 जानेवारीपासून महाकुंभ 2025 सुरू झाला आहे. हा जगातील सर्वात मोठा अध्यात्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम मानला जातो. जगभरातील भाविक यात सहभागी होत आहेत. 26 फेब्रुवारीला महाशिवरात्रीपर्यंत महाकुंभ सुरू राहणार आहे. पीएम मोदींपूर्वी उपराष्ट्रपती जगदीप धनखड, गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह अनेक बड्या नेत्यांनी महाकुंभला भेट दिली आहे.
पंतप्रधान मोदींचे संपूर्ण वेळापत्रक
- पंतप्रधान मोदी सकाळी 9:10 वाजता नवी दिल्लीहून निघतील आणि 10:05 वाजता प्रयागराजमधील बमरौली विमानतळावर पोहोचतील.
- विमानतळावरून सकाळी 10.35 वाजता हेलिकॉप्टर महाकुंभ परिसरातील डीपीएस मैदानावर असलेल्या हेलिपॅडवर उतरेल.
- पंतप्रधान मोदी सकाळी 10.45 वाजता अरेल घाटावर पोहोचतील.
- आरेल घाटातून निषाद राज क्रूझचे बोर्डिंग संगम नाक्यावर पोहोचेल.
- संगमावरील त्रिवेणीच्या प्रवाहात स्नान आणि गंगापूजन करतील.
- संगमावरच संत-महात्म्यांना भेटण्याचा कार्यक्रमही प्रस्तावित आहे.
- महाकुंभ परिसरातून बाहेर पडल्यानंतर डीपीएस मैदानावरून विमानतळावर जाऊ अन् तेथून नवी परत दिल्लीला रवाना होतील.
यापूर्वी 13 डिसेंबरला केला प्रयागराज दौरा
मोदी सरकार भारताच्या अध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारशाचा प्रचार आणि संवर्धन करण्यासाठी सतत काम करत आहे. मोदी सरकारने तीर्थक्षेत्रावरील पायाभूत सुविधा वाढविण्यासाठी सातत्याने सक्रिय पावले उचलली आहेत. यापूर्वी पंतप्रधान मोदींनी 13 डिसेंबर 2024 रोजी प्रयागराजला भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी 5,500 कोटी रुपयांच्या 167 विकास प्रकल्पांचे उद्घाटन केले होते.