शहरं
Join us  
Trending Stories
1
धडाधड यांचे उमेदवार पाडा, कांद्याकडे वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत होणार नाही; राजू शेट्टी कडाडले
2
मविआचे उमेदवार अजित पवारांच्या पाया पडले, दादा अवघडले; पंगतीला बोलणेही टाळले
3
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
4
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
5
ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्येच पडल्या, दोन वर्षांतली चौथी घटना
6
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा
7
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
8
“अशोक चव्हाण मोठे नेते असते तर मोदी-शाहांनी नांदेडमध्ये सभा घेतली नसती”: बाळासाहेब थोरात
9
"तू बारामतीचा उमेदवार बदल, मी प्रचार करतो"; अजितदादांनी सांगितला श्रीनिवास पवारांचा किस्सा
10
मला का काढलं? Prithvi Shaw भर मैदानात रिकी पाँटिंगसोबत वाद घालताना दिसला
11
"...मग साताऱ्यात उदयनराजेंच्या विरोधात प्रचार का करताय?", भाजपाचा संजय राऊतांना सवाल
12
TMKOC Sodhi Missing: गुरुचरण सिंग बेपत्ता प्रकरणावर पोलिसांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले, 'काही क्लू मिळालेत...'
13
“श्रीकृष्णासारखा नेता आमचे सारथ्य करणार आहे”; शिंदे गटातील नेत्याची PM मोदींवर स्तुतिसुमने
14
बस झालं, हार्दिक पांड्याला पूर्वीसारखं महत्त्व देण्याची गरज नाही; इरफान पठाण संतप्त 
15
"बँक से..," Kotak Mahindra बँकेचे शेअर्स आपटल्यावर अशनीर ग्रोव्हरनं उडवली खिल्ली
16
Vastu Shastra: देवघराजवळ 'या' गोष्टी ठेवणे त्रासदायक ठरू शकते; वाचा वास्तू नियम!
17
Akshaya Tritiya 2024: यंदा अक्षय्य तृतीया कधी? साडेतीन मुहूर्तांमध्ये या तिथीला स्थान का? वाचा!
18
अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केले ५३ पानी उत्तर, EDच्या आरोपांचा घेतला समाचार
19
सिट्रॉएन, महिंद्रानंतर होंडाची बारी; अमेझला 2019 मध्ये 4 स्टार, 2024 मध्ये दोन स्टार
20
T20 WC 2024: हर्षा भोगलेंनी निवडला भारतीय संघ; KL राहुलला वगळलं, नव्या चेहऱ्यांना संधी

PM मोदींनी केली आशियातील सर्वात मोठ्या विमानतळाची पायाभरणी, विरोधकांवर साधला निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2021 3:57 PM

मागील सत्तर वर्षात पहिल्यांदाच उत्तर प्रदेशाला इतक्या मोठ्या प्रमाणात सुविधा मिळत आहे.

नोएडा: पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Narendra Modi) यांनी उत्तर प्रदेशातील गौतम बुद्ध नगर येथील जेवार येथे नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाची पायाभरणी केली. या विमानतळासह यूपी आता 5 आंतरराष्ट्रीय विमानतळ असलेले देशातील पहिले राज्य बनले आहे. जेवारमध्ये बांधले जाणारे हे विमानतळ दिल्ली-एनसीआरमधील दुसरे आंतरराष्ट्रीय विमानतळ असेल आणि त्याच्या बांधकामानंतर इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील ताण बऱ्यापैकी कमी होईल. या कार्यक्रमात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांचीही उपस्थिती होती.

मोठी कनेक्टिव्हिटी असलेले पहिले विमानतळपायाभरणीनंतर पंतप्रधान मोदींनी जनतेला संबोधित केले. यावेळी ते म्हणाले की, आज या विमानतळाच्या भूमिपूजनासोबतच दाऊ जी जत्रेचे प्रसिद्ध दागिनेही आंतरराष्ट्रीय नकाशावर कोरले गेले आहेत. त्याचा मोठा फायदा दिल्ली एनसीआर आणि पश्चिम उत्तर प्रदेशातील कोट्यवधी लोकांना होणार आहे. 21व्या शतकातील नवा भारत आजच्या तुलनेत उत्तम आधुनिक पायाभूत सुविधा निर्माण करत आहे. चांगले रस्ते, चांगले रेल्वे नेटवर्क, चांगले विमानतळ हे केवळ पायाभूत सुविधांचे प्रकल्प नाहीत, तर ते संपूर्ण प्रदेशाचा कायापालट करतात, लोकांचे जीवन बदलतात. कनेक्टिव्हिटीच्या दृष्टिकोनातूनही हे विमानतळ उत्तम मॉडेल बनवेल. येथे येण्यासाठी टॅक्सीपासून मेट्रो आणि रेल्वेपर्यंत प्रत्येक कनेक्टिव्हिटी असेल. विमानतळावरुन बाहेर पडताच तुम्ही थेट यमुना एक्सप्रेसवेवर येऊ शकता.

सोबत मिळून पुढे जाऊ

पीएम मोदी म्हणाले की, याआधीच्या सरकारच्या काळात शेतकऱ्यांकडून जमिनी घेतल्या जात होत्या, पण नुकसान भरपाईची समस्या होती किंवा जमीन वर्षानुवर्षे पडून राहायची. हे अडथळेही आम्ही शेतकऱ्याच्या हितासाठी, देशाच्या हितासाठी दूर केले. प्रशासन शेतकऱ्यांकडून वेळेवर जमीन खरेदी करेल याची खातरजमा करून आम्ही 30 हजार कोटींच्या या प्रकल्पाचे भूमिपूजन केले. आज सर्वसामान्य नागरिकांचे विमान प्रवासाचे स्वप्नही पूर्ण होत आहे. मला आनंद आहे की गेल्या काही वर्षांत एकट्या यूपीमधील 8 विमानतळांवरून उड्डाणे सुरू झाली आहेत, अनेकांवर काम सुरू आहे. आपल्या देशातील काही राजकीय पक्षांनी नेहमीच आपला स्वार्थ सर्वोपरी ठेवला आहे. हे लोक आपल्या स्वार्थाचा विचार करतात आणि फक्त आपल्या कुटुंबाचा विकास करतात. काही दिवसांपूर्वी कुशीनगर येथील विमानतळाचे उद्घाटन करण्यात आले आहे. यूपीमध्ये 9 वैद्यकीय महाविद्यालयांचे उद्घाटन करण्यात केले. झाशीतील डिफेन्स कॉरिडॉरच्या कामाला गती मिळाली. पूर्वांचल द्रुतगती मार्ग गेल्या आठवड्यात समर्पित करण्यात आला. मध्य प्रदेशमध्ये एका अतिशय भव्य आधुनिक रेल्वे स्थानकाचे उद्घाटन करण्यात आले आहे. महाराष्ट्रात शेकडो किमी महामार्गाची पायाभरणी व उद्घाटन करण्यात आले. आज देशात 21 व्या शतकातील गरजा लक्षात घेऊन काम वेगाने सुरू आहे. हीच सशक्त भारताची हमी आहे. 

विरोधकांवर साधला निशाणा

यूपीच्या आधीच्या अखिलेश यादव सरकारवर निशाणा साधत पीएम मोदी म्हणाले की, काही राजकीय पक्ष केवळ त्यांच्या कुटुंबासाठी, प्रदेशासाठी आणि समाजासाठी काम करतात. देशातील राजकीय परिस्थिती काहीही असो, पण भारतातील विकासाचे काम थांबलेले नाही. अलीकडेच देशात 100 कोटी लसीचे डोस देण्यात आले आहेत. कुशीनगरमध्येच विमानतळाचे उद्घाटन झाले आहे. 9 वैद्यकीय महाविद्यालयांचे उद्घाटन करण्यात आले आहे. मागील आठवड्यातच पूर्वांचल एक्सप्रेसवे यूपीच्या लोकांना समर्पित करण्यात आला. मध्य प्रदेशमध्ये एका भव्य रेल्वे स्थानकाचे उद्घाटन करण्यात आले असून आज नोएडा इंटरनॅशनलचे भूमिपूजन झाले आहे. काही राजकीय पक्षांचे स्वार्थी धोरण आपल्या राष्ट्रसेवेसमोर टिकू शकत नाही.  स्वातंत्र्याच्या 70 वर्षापर्यंत यूपीला टोमणे ऐकावे लागले. कधी हजारो रुपयांच्या घोटाळ्याचे टोमणे, कधी खराब रस्त्यांचे टोमणे, कधी रखडलेल्या विकासाचे टोमणे, कधी गुन्हेगारी माफियांच्या युतीचे टोमणे. यूपी कधीतरी सक्षम होणार का, असा प्रश्न यूपीतील कर्तबगार जनतेला पडला होता. उत्तर प्रदेशला वंचित आणि अंधारात ठेवणाऱ्या पूर्वीच्या सरकारांनी खोटी स्वप्ने दाखवली, तर आज उत्तर प्रदेश राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही छाप सोडत आहे. आज यूपीमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या वैद्यकीय आणि शैक्षणिक संस्था उभारल्या जात आहेत. आज यूपी हे बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या गुंतवणुकीचे केंद्र आहे. हे सर्व आज आपल्या यूपीमध्ये घडत आहे.

प्रकल्पाला उशीर झाल्यास दंड आकारला जाईल

पीएम मोदी म्हणाले की, ज्याला आधीच्या सरकारांनी खोटी स्वप्ने दाखवली, आज तेच यूपी आंतरराष्ट्रीय स्तरावर छाप सोडत आहे. आज यूपीला आंतरराष्ट्रीय स्तरावरील वैद्यकीय संस्था, रेल्वे, महामार्ग, हवाई संपर्क मिळत आहे. म्हणूनच आज देशातील आणि जगातील गुंतवणूकदार म्हणतात यूपी म्हणजे सर्वोत्तम सुविधा, सतत गुंतवणूक. यूपीच्या या आंतरराष्ट्रीय ओळखीला नवे आयाम मिळत आहेत. जेवार विमानतळ हे देखील एक त्याचेच उदाहरण आहे. दोन दशकांपूर्वी यूपीच्या भाजप सरकारने या प्रकल्पाचे स्वप्न पाहिले होते, परंतु नंतर अनेक वर्षे दिल्ली आणि लखनऊच्या आधीच्या सरकारांच्या वादात हा विमानतळाचे काम अडकले होता. उत्तर प्रदेशातील आधीच्या सरकारने तत्कालीन केंद्र सरकारला पत्र लिहून विमानतळ प्रकल्प बंद करण्याची मागणी केली होती. आता डबल इंजिन सरकारच्या प्रयत्नाने आज त्याच विमानतळाचे भूमिपूजन होत आहे. आता याचे काम वेळेत पूर्ण होईल याची आम्ही काळजी घेत आहोत. विलंब झाल्यास दंड आकारला जाईल, अशी ताकीद यावेळी मोदींनी दिली.

शेतकऱ्यांना थेट निर्यात करता येणारते पुढे म्हणाले की, आज आपण एमआरओ सेवेसाठी 85 टक्के विमाने परदेशात पाठवतो आणि या कामासाठी दरवर्षी 15 हजार कोटी रुपये खर्च केले जातात. त्यापैकी बहुतांश इतर देशांत जातात, पण आता या विमानतळामुळे ही परिस्थिती बदलण्यास मदत होणार आहे. या माध्यमातून देशात प्रथमच अँटिग्रेटेड मल्टी मॉडेल कार्गो हबची कल्पनाही साकार होत आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रदेशाच्या विकासाला नवी चालना मिळेल. ज्या राज्यांच्या सीमा समुद्राला लागून आहेत त्यांच्यासाठी बंदरे ही खूप मोठी संपत्ती आहे, हे आपल्या सर्वांना माहीत आहे. परंतु यूपीसारख्या भूपरिवेष्टित राज्यांसाठी विमानतळाची हीच भूमिका आहे. अलीगढ, मथुरा, मेरठ, आग्रा, बिजनौर, मुरादाबाद, बरेली येथे अशी अनेक औद्योगिक क्षेत्रे आहेत. सेवा क्षेत्राची परिसंस्थाही येथे आहे आणि पश्चिम यूपीचा कृषी क्षेत्रातही मोठा वाटा आहे. आता या विमानतळामुळे या भागांची ताकदही वाढणार आहे. आता येथील शेतकरी फळे, भाजीपाला, मासे या नाशवंत उत्पादनांची थेट निर्यात करू शकतील.

अनेक प्रोजेक्ट्सवर काम सुरूपंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, विमानतळाच्या बांधकामादरम्यान हजारो रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत. हे सुरळीत चालण्यासाठीही हजारोंची गरज आहे. पश्चिम उत्तर प्रदेशातील हजारो लोकांना नवीन रोजगार मिलणार आहे. आज आम्ही प्रवासी सेवेसाठी हिंडन विमानतळ सुरू केले आहे. तसेच हरियाणातील हिसार येथील विमानतळावरही काम सुरू आहे. हवाई संपर्क वाढला की पर्यटनही वाढते. माता वैष्णोदेवीचे दर्शन असो की केदारनाथ यात्रा, तेथे भाविकांची संख्या वाढत आहे. स्वातंत्र्याच्या 7 दशकांनंतर पहिल्यांदाच यूपीला ते मिळू लागले आहे, ज्याची त्यांची नेहमीच हक होती. डबल इंजिन सरकारच्या प्रयत्नांमुळे आज यूपी देशातील सर्वात कनेक्टेड प्रदेश बनत आहे. रॅपिड रेल कॉरिडॉर, एक्स्प्रेस वे, मेट्रो कनेक्टिव्हिटीचे काम सुरू आहे, अशी माहिती मोदींनी दिली. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीyogi adityanathयोगी आदित्यनाथBJPभाजपा