शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
4
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
5
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
6
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
7
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
9
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
10
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
11
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
12
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
13
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
14
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
15
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
16
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
17
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
18
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
19
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
20
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?

आता प्रत्येकाकडे असणार हेल्थ कार्ड, पंतप्रधानांनी लाँच केलं Ayushman Bharat Digital Mission; जाणून घ्या योजनेबाबत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2021 11:49 AM

Ayushman Bharat Digital Mission: पाहा काय आहे ही योजना आणि कसं तयार करता येणार कार्ड.

ठळक मुद्देपाहा काय आहे ही योजना आणि कसं तयार करता येणार कार्ड.

Ayushman Bharat Digital Mission: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पंतप्रधान डिजिटल आरोग्य मिशन लाँच केलं. पंतप्रधानांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयुष्यमान भारत डिजिटल मिशन लाँच केलं. या मोहिमेसाठी सरकारनं ऐतिहासिक करार केला आहे आणि याअंतर्गत प्रत्येक नागरिकाकडे हेल्थ आयडी असणार आहे. हे कार्ड पूर्णपणे डिजिटल असे आणि ते आधार कार्डाप्रमाणेच दिसणार आहे. या कार्डावर एक आधार प्रमाणेच नंबरही असेल. याद्वारे आरोग्य क्षेत्रात संबंधित व्यक्तीची ओळख पटवली जाईल."गेल्या सात वर्षांमध्ये देशातील आरोग्य व्यवस्था अधिक बळकट करण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. आज तो एका नव्या टप्प्यात प्रवेश करत आहे. आज एका अशा मोहिमेची सुरूवात करण्यात येत आहे, ज्यामध्ये भारताच्या आरोग्य सुविधांमध्ये क्रांतीकारी बदल आणण्याची ताकद आहे," असं पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले. "डिजिटल इंडिया या मोहिमेनं सामान्यांची ताकद अधिक वाढवली आहे. आज आपल्या देशातत १३० कोटी आधार क्रमांक, ११८ कोटी मोबाईल वापरकर्ते, ८० कोटी इंटरनेट वारकर्ते आमि ४३ कोटी जनधन बँक खाती आहेत. असं जगात अन्य ठिकाणी कुठेही नाही," असंही त्यांनी स्पष्ट केलं. आरोग्य सेतूचाही उल्लेख"आरोग्य सेतू अॅपमुळे देशात कोरोनाचा प्रसार रोखण्यास मदत मिळाली. यासोबत सर्वांना देशात मोफत कोरोना प्रतिबंधात्मक लसही देण्यात येत आहे. आतापर्यंत ९० कोटी लोकांना करोना प्रतिबंधात्मक लस देण्यात आली. यामध्ये कोविनची मोठी भूमिका आहे," असं पंतप्रधान म्हणाले.असा तयार करा हेल्थ आयडीपब्लिक कम्युनिटी हॉस्पीटल, कम्युनिटी हेल्थ सेंटर, हेल्थ अँड वेलनेस सेंटर किंवा असा हेल्थकेअर प्रोवाडर जो नॅशनल हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चरशी जोडलेला असेल, ते कोणत्याही व्यक्तीचा हेल्थ आयडी तयार करू शकातात. याशिवाय https://healthid.ndhm.gov.in/register या संकेतस्थळाला भेट देऊन तुम्ही नोंदणीही करू शकता आणि आपलं हेल्थ आयडी तयार करू शकता. 

काय आहे फायदा?युनिक हेल्थ आयडीमुळे रुग्णांना डॉक्टरांकडे जाताना फाईल्स सातत्यानं नेण्यापासून सुटका मिळेल. तसंच डॉक्टरांनाही नंबरच्या सहाय्यानं रुग्णांचा डेटा पाहण्यास आणि त्यांची माहिती घेण्यास माहिती मिळेल. याच आधारावर रुग्णांवर पुढील उपचार केले जाणार आहे. तसंच संबंधित व्यक्तीला कोणत्या सरकारी योजनांचा लाभ मिळतो हेदेखील त्यावरून समजणार आहे. 

या हेल्थ कार्डसाठी संबंधित व्यक्तीचा मोबाईल नंबर आणि आधार कार्ड क्रमांक घेतला जाईल. याच्या सहाय्यानं मोबाईल हेल्थ कार्ड तयार केलं जाणार आहे. यासाठी सरकार एक हेल्थ अथॉरिटी बनवेल जे व्यक्तीचा डेटा गोळा करणार आहे. ज्या व्यक्तीला हेल्थ आयडी तयार करायचं आहे त्याच्या रेकॉर्ड जमा करण्याची हेल्थ अथॉरिटीकडून परवानगी देण्यात येईल. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीprime ministerपंतप्रधानIndiaभारतHealthआरोग्य