शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

कृषी, शिक्षण, आरोग्य क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञान वापरणार - नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2024 9:58 AM

पंतप्रधान मोदी यांनी साधला बिल गेट्स यांच्याशी संवाद

नवी दिल्ली : समाजसेवी आणि मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दिलखुलास संवाद साधला. कृषी, शिक्षण आणि आरोग्य या तीन क्षेत्रांत तंत्रज्ञानाच्या वापराबद्दल आपण सर्वाधिक उत्सुक आहोत, असे सांगत पंतप्रधान मोदी यांनी या क्षेत्रातील सरकारच्या प्रयत्नांवर प्रकाश टाकला. 

तंत्रज्ञान, विविध क्षेत्रांत त्याचा वापर आणि हवामान बदल यासह अनेक मुद्यांवर गेट्स यांच्याशी संवाद साधताना मोदी म्हणाले की, आपण जगात डिजिटल विभाजनाबद्दल ऐकले होते आणि तेव्हाच भारतात हे होऊ देणार नाही, असे ठरविले होते. गर्भाशय कर्करोगावर कमीत कमी खर्चात लस विकसित करण्यासाठी स्थानिक संशोधकांना मदत म्हणून निधी देण्याची आपली इच्छा आहे.

आपले नवीन सरकार या गंभीर आजाराविरुद्ध लसीकरण सुनिश्चित करण्यासाठी काम करेल. त्यासाठी डिजिटल पायाभूत सुविधांची गरज आहे. गेट्स यांनी भारताच्या तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचे कौतुक करत भारत या मार्गावर अग्रेसर असल्याचे सांगितले. गेट्सच्या एका प्रश्नावर पंतप्रधान म्हणाले की, मला तंत्रज्ञानाची आवड आहे पण त्याचा गुलाम नाही. मी तज्ज्ञ नाही पण तंत्रज्ञानाबद्दल मुलांसारखी उत्सुकता आहे. 

‘एआय’चा गैरवापर होण्याचा धोकाकृत्रिम बुद्धिमत्ता (एआय)सारखे शक्तिशाली तंत्रज्ञान अकुशल हातात गेल्यास त्याचा गैरवापर होण्याचा मोठा धोका आहे. चुकीची माहिती टाळण्यासाठी एआय निर्मित सामग्रीमध्ये स्पष्ट वॉटरमार्क असणे आवश्यक आहे. एआय निर्मिती करताना काय करावे आणि करू नये हे निश्चित करणे आवश्यक आहे, अशी सूचना मोदींनी केली. 

आणखी काय काय बोलले मोदी?नागरिकांच्या राहणीमानात लक्षणीय सुधारणा करण्यासाठी तंत्रज्ञानाचा लाभ घेण्यावर विश्वास.खर्च कमी करण्यासाठी सर्व विद्यापीठ प्रमाणपत्रे क्लाउड स्टोअरेजमध्ये साठवण्यास सुरुवात.डेटा सुरक्षा सर्वांत महत्त्वाची चिंता.भारत अक्षय ऊर्जेच्या क्षेत्रात वेगाने प्रगती आणि हरित हायड्रोजनच्या वापराला प्रोत्साहन देत आहे. खेड्यापाड्यात तंत्रज्ञान घेऊन जात आहोत. दोन लाखांहून अधिक आरोग्य केंद्रांना तंत्रज्ञानाने सर्वोत्तम रुग्णालयांशी जोडले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBill Gatesबिल गेटसlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४